UP cabinet approves lifetime free bus travel for women above 60 saam tv
देश विदेश

महिलांसाठी मोफत बससेवा, तरुणांना मोफत टॅबलेट; मुख्यमंत्र्यांचे 6 मोठे निर्णय

UP Cabinet Approves Lifetime Free Bus Travel For Women Above 60: योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील यूपी कॅबिनेट बैठकीत महिलांसाठी मोफत बसप्रवास आणि तरुणांसाठी 25 लाख मोफत टॅबलेटसह अनेक मोठ्या निर्णयांना मंजुरी.

Omkar Sonawane

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 24 मोठ्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. महिलांसाठी, तरुणांसाठी आणि राज्याच्या औद्योगिक विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये 60 वर्षांवरील महिलांना उत्तर प्रदेश सरकारी बसमधून आजीवन मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्याचा निर्णय सर्वाधिक चर्चेत आहे. तसेच, तरुणांसाठी 25 लाख मोफत टॅबलेट देण्याचीही मोठी घोषणा करण्यात आली आहे.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

60 वर्षांवरील महिलांना यूपी महामंडळच्या बसमधून आजीवन मोफत प्रवास.

425 कोटी रुपये खर्च करून 250 इलेक्ट्रिक बस खरेदी.

सुलतानपूरमध्ये 272.25 कोटी रुपये खर्चून इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग अँड लॉजिस्टिक्स क्लस्टर विकसित करण्यात येणार.

गंगा एक्स्प्रेसवेचा विस्तार हरिद्वारपर्यंत करण्यात येणार असून यासाठी सुमारे 10,761 कोटी रुपये खर्च केले जाणार.

तरुणांसाठी 25 लाख मोफत टॅबलेट खरेदी करण्यात येणार.

आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये युवा सशक्तीकरण योजनेसाठी 2,374.60 कोटी रुपयांची तरतूद.

60 वर्षांवरील महिलांना आजीवन मोफत प्रवास

योगी सरकारने लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाच्या बसमधून आयुष्यभर मोफत प्रवास करता येणार आहे. परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांना होण्याची अपेक्षा आहे. रक्षाबंधनापूर्वी महिलांसाठी योगी सरकारकडून ही मोठी भेट मानली जात आहे. प्रवासादरम्यान महिलांना वयाचा पुरावा दाखवावा लागणार असून त्यासाठी आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र वापरता येणार आहे.

250 इलेक्ट्रिक बसही खरेदी होणार

मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी 250 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. या बसमध्ये 42 आणि 52 आसनव्यवस्थेचा समावेश असेल. या बस खरेदीसाठी सुमारे 425 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये लेटर वॉर

मराठी सक्तीच्याविरोधात रिक्षा-टॅक्सीचालकांची हायकोर्टात धाव; निर्णय स्थगितीची मागणी

किडनी स्टोन की युरीन इन्फेक्शन? दोघांमधील फरक कसा ओळखायचा?

Kalyan Tourism : एक दिवसाची भन्नाट ट्रिप! फिरा कल्याणजवळची ५ बेस्ट मॉन्सून पिकनिक स्पॉट्स

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी प्यायल्याने काय होते? 5 फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल

SCROLL FOR NEXT