Sanjay Raut Saam Tv
देश विदेश

UP Assembly Election: 'ED च्या भितीने मायावती थंड; आखिलेश यादव विजयी रथावर'

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेश: ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) धाकाने मायावती थंडावल्या आहेत, अशा अफवा जोरात आहेत. अखिलेश यादव यांनाही तीन वर्षे अशाच तणावाखाली ठेवण्यात आले होते. आज ते बाहेर पडले आहेत. उत्तर प्रदेशात (UP Assembly Election) भाजपचा पराभव निश्चित दिसत आहे. महाराष्ट्रातही केंद्रीय तपास यंत्रणांच्या निषेधार्थ असाच स्फोट होईल, मग भाजप काय करणार'? असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलं आहे.

शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'रोखठोक' या अग्रलेखातून भाजपवर हल्ला चढवला आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'भाजप नेते त्यांच्या प्रचार दौऱ्यात सांगत होते की, अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव मुख्यमंत्री असताना आझम खान, अतिक अहमद, मुख्तार अन्सारी त्यांच्यासोबत दिसत होते. पण आता तुम्ही त्यांना योगींच्या राजवटीत पाहिले का? त्याच भाजपने गोव्यात अशा लोकांना उमेदवारी दिली आहे, ज्यांच्यापासून आझम खान, मुख्तार अन्सारी मागे राहतील.

गोव्याची राजधानी पणजीत भाजपकडून बाबूश मोन्सेरात यांच्या उमेदवारीवर संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपचे दिवंगत नेते आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांना तिकीट दिले नाही. आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्याला शिवसेना पाठिंबा देत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या लेखात दावा केला आहे की, भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्याकडे बलात्कारासह अनेक गुन्ह्यांच्या डिग्री आहेत.

'अखिलेश यादव उत्तर प्रदेशात 200 हून अधिक जागा जिंकतील'

संजय राऊत यांनी आपल्या अग्रलेखात लिहिले आहे की, 'केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने नेते घरी बसतील, पण तुमच्या विरोधातील जनतेचा राग कसा थांबवणार? अखिलेश यादव उत्तर प्रदेशात 200 हून अधिक जागा जिंकतील. 2024 मध्ये महाराष्ट्रातही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून बदला भाजपला विजय मिळवून देऊ शकणार नाही. गोव्यात भाजप पुन्हा येणार नाही आणि उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा विजय निश्चीत आहे. रॉ आणि सीबीआय इंदिरा गांधींना पराभवापासून वाचवू शकले नाहीत.

'इडी सीबीआईचा चुकीच्या वापराने मोदी शहांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह'

महाराष्ट्रामध्ये तपास यंत्रणांच्या चुकीच्या वापरावर संजय राऊत पुढे लिहीतात. 'ईडी उद्या कोणाच्या घरी धाड टाकणार हे किरीट सोमय्या सांगतात. भाजपाचे किरीट सौमय्या ब्लॅकमेल करतात. त्यांच्याच सांगण्यावरुन ईडी कारवाई करते. यामुळे मोदी आणि शहांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थीत झाले आहेत. 2024 मध्ये सध्याची सरकार येणार नाही हे ठरलेलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये हे चित्र आणखी स्पष्ट होईल. सध्या नैतिकता आणि प्रतिष्ठेची गंगा वाहत आहे. महाराष्ट्रालाही सुडाच्या आणि निराधार राजकारणाच्या प्रवाहातून बाहेर काढायचे आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT