Tamil Nadu Unseasonal Rain Updates  Saam TV
देश विदेश

Rains Updates: अवकाळी पावसाचा तामिळनाडूला तडाखा; अनेक भागात पूरस्थिती, ७ हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर

Unseasonal Rain Updates: मिचाँग चक्रीवादळाच्या प्रकोपातून सावरलेल्या तामिळनाडूला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.

Satish Daud

Tamil Nadu Unseasonal Rain Updates

मिचाँग चक्रीवादळाच्या प्रकोपातून सावरलेल्या तामिळनाडूला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. हिंदी महासागरातील केप कोमोरिनजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

थुथुकुडीमध्ये आतापर्यंत ५२५ मिमीपेक्षाही जास्त पावसाची नोंद (Rain News) करण्यात आली आहे. त्यामुळे या भागाला चौहीकडून पुराचा वेढा पडला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्यात येत आहे. आतापर्यंत ७ हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

मुसळधार पावसाचा फटका रेल्वेला देखील बसला आहे. स्टेशनवरील ट्रॅकवर पाणी साचल्याने अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वेगाड्यांचा (Indian Railway) मार्ग बदलण्यात आला आहे. श्रीवैकुंटममध्ये पुरामुळे सुमारे ८०० रेल्वे प्रवासी अडकले आहेत. चक्रीवादळामुळे विमानसेवांवरही विपरित परिणाम झाला आहे.

अवकाळी पावसामुळे तामिनाडूतील अनेक जिल्ह्यातील शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी आदेश येईपर्यंत शाळा-कॉलेज उघडू नका, असे आदेश प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. तिरुनेलवेली, तुतीकोरीन, तेनकासी आणि कन्याकुमारीमध्ये पुरामुळे सर्वाधिक परिस्थिती बिघडली आहे.

दरम्यान, पुढील २४ तासांत तामिळनाडूत अवकाळी पावसाचा कहर सुरूच राहणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पूरस्थिती लक्षात घेता, राज्य सरकारने दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये राज्य आपत्ती निवारण दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या २५० हून अधिक जवानांना तैनात केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT