चिखला काकड पुतळा प्रकरणात मोठी अपडेट
शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री कायंदे यांचा राजीनामा
कायंदेंच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज्याचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशानाआधी महायुती सरकारची पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. बुलढाण्यातील शिवसेनेच्या जयश्री दीपक कायंदे यांनी पक्षाच्या प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे बुलढाण्यातलं राजकीय समीकरण बदलणार आहे.
बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणावरून वाद तापला. या प्रकरणावरून शिवसेनेच्या कायंदेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुतळा प्रकरणावरून शिवसेना नेते डॉ. शशिकांत खेडेकर यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी घेतलेल्या कथित भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद केले.
जयश्री दीपक कायंदे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, एकतर्फी भूमिका घेत समाजाबद्दल तिरस्काराराची भावना दर्शवली गेल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा उल्लेख करत पक्षाने सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सामाजिक भावनांचा आदर राखण्यासाठी पदत्याग करत असल्याचेही त्यांनी सांगितले.माझा राजीनामा मंजूर करून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. कायंदे यांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
आता पुढील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागलं आहे. त्यांच्या राजीनाम्यावर शिंदे गटाच्या कोणत्याही नेत्यांकडून अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाही. यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.