पहलगाम हल्ल्यासाठी TRF जबाबदार असल्याचं UNSCच्या अहवालात नमूद.
पाकिस्तानच्या लष्कराने TRFला मदत केली, असाही दावा.
पाकिस्तानने जबाबदारी नाकारली होती, पण TRFने दोनदा कबुली दिली.
भारताच्या युक्तिवादाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळालाय.
UNSC Report Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ दहशतवादी संघटनेनी दोन वेळा स्वीकारली आहे. त्याशिवाय त्यांनी हल्ल्याचे फोटोही पोस्ट केले होते, असा दावा UNSC मध्ये रिपोर्टमध्ये सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ला TRF नेच केला आहे. पहलगाम हल्ल्यासाठी लष्कर ए तोय्यबाने दहशतवाद्यांना मदत केली. त्याशिवाय असा हल्ला होऊच शकत नाही, असेही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) देखरेख अहवालात पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे टीआरएफच असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादाशी संबंध असल्याचे पुन्हा एकदा जगासमोर उघड झालेय. लष्कर-ए-तोय्यबाच्या पाठिंब्याशिवाय हा हल्ला शक्य झाला नसता, असेही अहवालात म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी नाकारणारा पाकिस्तान जागतिक पातळीवर आता तोंडघशी पडला आहे.
पहलगाम दहशथवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने घेतली नव्हती. या हल्ल्यातील आपला सहभाग पाकिस्तान सातत्याने नाकारत होता. मात्र, यूएनएससीच्या अहवालात पहलगाम हल्ल्यामागे टीआरएफची भूमिका असल्याचे स्पष्ट सांगितलेय. भारत सरकारने यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. मे महिन्यात भारताच्या एका पथकाने यूएनच्या 1267 प्रतिबंध समितीसमोर याबाबात सविस्तर माहिती सादर केली होती.
लष्कर ए तोय्यबाच्या शिवाय हल्ला शक्यच नाही, जगासमोर पाकिस्तान तोंडघशी -
टीआरएफ नावाच्या दहशतवादी संघटना २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होती. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोय्यबाच्या पाठिंब्याशिवाय हा हल्ला शक्य झाला नसता. यूएनएससीच्या पथकाने हेही स्पष्ट केले की, टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी दोनदा स्वीकारली आणि हल्ल्याच्या ठिकाणची छायाचित्रेही प्रसिद्ध केली.
पहलगाम हल्ल्यावरून वारंवार भारतावरच आरोप करणारा पाकिस्तान जगासमोर तोंडघशी पडला आहे. यूएनएससीच्या या अहवालामुळे भारताने केलेला दावा आता अधिक बळकट झाला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (यूएनएससी) एक पथक दहशतवादावर लक्ष ठेवते. या पथकाने आपल्या अहवालात पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला आहे. त्या अहवालात टीआरएफ नावाच्या संघटनेचा उल्लेख केला आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. टीआरएफ ही पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोय्यबा या दहशतवादी संघटनेशी जोडलेली आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय पहलगाम हल्ला शक्यच झाला नसता, असेही अहवालात म्हटले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला कधी आणि कुठे झाला?
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात हा हल्ला झाला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला?
26 पर्यटकांचा मृत्यू झाला, यात एका नेपाळी नागरिकाचा समावेश आहे.
पहलगाम हल्ल्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे?
लष्कर-ए-तोय्यबाशी संबंधित 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने कसे प्रत्युत्तर दिले?
भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवून पाकिस्तान आणि PoK मधील 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे काय झाले?
ऑपरेशन महादेव अंतर्गत तिन्ही दहशतवादी (सुलैमान शाह, हम्जा, जिबरान) ठार झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.