Unnao Crime: दलित बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला; नेत्याच्या मुलावर हत्येचा आरोप Saam Tv
देश विदेश

Unnao Crime: दलित बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला; नेत्याच्या मुलावर हत्येचा आरोप

उत्तर प्रदेश पोलिसांना उन्नावमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्नाव: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांना उन्नावमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या तरुणीच्या हत्येचा आरोप (Allegations) समाजवादी पक्षाचे माजी मंत्री फतेह बहादूर सिंह यांचा मुलगा राजोल सिंह याला पोलिसांनी (Police) अटक (Arrested) केली आहे. (unnao dalit girl killed by former ministers son samajwadi party uttar pradesh)

हे देखील पहा-

आरोपीच्या नावे असलेल्या एका प्लॉटमध्ये हा मृतदेह जमिनीत गाढण्यात आला असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. एसपी शशी शेखर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार की, 8 डिसेंबर दिवशी या प्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली होती.

तपासानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यावरच या प्रकरणाची अधिक माहिती समोर येणार आहे. मृतदेह ताब्यात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांची अवस्था दयनीय झाली आहे.

मृत मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार की, राजोल सिंहने तिच्या मुलीला जबरदस्तीने सोबत घेऊन गेले होते. इतके दिवस पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही. एसपी उन्नाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे वय सुमारे 22 वर्षे आहे. पोलिसांची 2 पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने अनेक खुलासे केले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT