Wedding Saam Tv
देश विदेश

Wedding: दोन सख्ख्या भावांनी थाटला एकाच तरुणीसोबत संसार, असं करण्यामागचं कारण काय? पाहा VIDEO

Himachal Pradesh Wedding: सध्या सोशल मीडियावर एका लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. दोन सख्ख्या भावांनी एका तरुणीसोबत लग्न केले. या लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणांनी एकाच मुलीसोबत लग्न करण्यामागचं कारण देखील समोर आलं.

Priya More

हिमाचल प्रदेशमधील एका लग्नाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. दोन सख्ख्या भावांनी एकाच तरुणीसोबत लग्न केले. हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील गिरीपार येथील हाटी परिसर मोठ्या धुमधडाक्यात हा विवाहसोहळा पार पडला. सध्या फक्त हिमाचल प्रदेशमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात या लग्नाची चर्चा होत आहे. सिरमौरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर प्राचीन बहुपति प्रथेला पुनर्जीवित केले गेले.

सिरमौर परिसरातील दोन सख्ख्या भावांनी एका तरुणीसोबत एकाच मंडपात सात फेरे घेतले. हे लग्न हाटी समाजाची परंपरा उजला पक्षाच्या अंतर्गत झाला. या लग्नसोहळ्यात गावातील सर्वजण सहभागी झाले होते. ही परंपरा संपत्तीच्या वाटणीला आळा घातले आणि संयुक्त कुटुंबाला प्रोत्साहन देते. याठिकाणी दोन्ही भावांनी पारंपारिक हिंदू रितीरिवाजांनुसार तरुणीशी लग्न केले. या तिघांच्याही संमतीने हे लग्न झाले.

लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पांडव काळातील या परंपरेची चर्चा सगळीकडे होत आहे. हिमाचलमधील सिरमौर, किन्नौर आणि उत्तराखंडमधील जौनसर बावर सारख्या भागात बहुपती प्रथा प्रचलित आहे. शिलाई गावातील दोन भाऊ प्रदीप सिंग आणि कपिल सिंग यांनी जोडारी परंपरेनुसार परिसरातील एका तरुणीशी लग्न केले. दोन्ही भावांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत एकाच तरुणीसोबत लग्नाचे विधी पार पाडले. हा विवाह हाटी समुदायाच्या जोडारी परंपरेनुसार झाला ज्यामध्ये दोन किंवा अधिक भाऊ संयुक्तपणे एका तरुणीसोबत लग्न करतात.

प्रदीप आणि कपिल यांनी या परंपरेनुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्याला ते विश्वास, काळजी आणि सामायिक जबाबदारीचे नाते मानतात. केंद्रीय हाटी समिती गिरिपार प्रदेशाचे सरचिटणीस कुंदन सिंह शास्त्री म्हणाले की, महाभारत काळातील पांडव संस्कृती ही या प्रथेच्या प्रचलनाचे मुख्य स्रोत मानली जाते. या दोन्ही भावांनी सांगितले की, त्यांनी परस्पर संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुलीनेही या लग्नाला होकार दिला.

नवरीने सांगितले की, 'हा तिचा स्वतःचा निर्णय होता, कोणाचाही दबाव नव्हता.' या लग्नाला शेकडो ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते आणि तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात पारंपारिक पदार्थ बनवण्यात आले होते. लग्नाला आलेल्या पाहुण्याने सांगितले की, 'जोडीदारी पद्धतीनुसार लग्न करण्याचे कारण म्हणजे वडिलोपार्जित मालमत्तेचे विभाजन रोखणे, महिलांना विधवा होण्यापासून रोखणे आणि कुटुंबात एकता राखणे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PPF Calculation: निवृत्तीनंतरही दरमहा ₹1 लाख मिळवायचे आहेत? पीपीएफचं जबरदस्त गणित समजून घ्या

Maharashtra Politics : महायुती फिस्कटली, पण नवीच आघाडी उदयास आली; बदलापूरचं राजकारण फिरलं

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडली साथ; शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Konkan Food : कोकण स्पेशल 'वाटपाची डाळ', चाखाल अस्सल गावरान चव

Sarara Suits: लग्नसराईसाठी लेहेंगा किंवा ड्रेसपेक्षा ट्राय करा क्लासिक शरारा सूट, दिसाल ग्लॅमरस आणि हटके

SCROLL FOR NEXT