Budget 2023  SAAM TV
देश विदेश

Union Budget 2023 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, आज आर्थिक पाहणी अहवालही सादर होणार

यावर्षी जम्मू-काश्मीरसह दहा राज्यांमध्ये विधानसभा आणि पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातून जनतेला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

साम टिव्ही ब्युरो

Union Budget 2023 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज मंगळवारपासून सुरू होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. या अधिवेशनात मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प उद्या 1 फेब्रुवारीला सादर करणार आहे. आजच आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या भागात 13 फेब्रुवारीपर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पावर चर्चा होईल. यादरम्यान पंतप्रधान संबोधनावरील चर्चेला उत्तर देतील. पहिल्या भागात कोणतेही विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाणार नाही किंवा मंजूर केले जाणार नाही. 13 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत वैधानिक कामकाजाचा निपटारा केला जाईल.

अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतील. अर्थसंकल्पीय अभ्यासाशी संबंधित चार विधेयकांसह सुमारे 36 विधेयके सादर करण्याची सरकारची योजना आहे. 6 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 27 बैठका होणार आहेत.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावर्षी जम्मू-काश्मीरसह दहा राज्यांमध्ये विधानसभा आणि पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातून जनतेला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

नेहमीप्रमाणेच मध्यमवर्ग कर सवलतीच्या प्रतीक्षेत आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित विविध क्षेत्रांनाही अर्थसंकल्पातून दिलासा मिळण्याची आशा आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार निवडणूक असलेल्या राज्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करू शकते.

आर्थिक सर्वेक्षणातून अर्थव्यवस्थेची स्थिती समोर येईल

सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सादर होणाऱ्या आर्थिक सर्वेक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्थिक सर्वेक्षणातून देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती स्पष्ट होते. या आधारे तज्ज्ञ सर्वसाधारण अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत अंदाज बांधतात. अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सरकारने मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सपा, बसपा आणि काँग्रेसचे सदस्य गैरहजर राहिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

SCROLL FOR NEXT