Palghar Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार-बसमध्ये भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू

अपघात इतका भीषण होता की बस आणि कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
Palghar Accident
Palghar Accident Saam TV

>> रुपेश पाटील

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि लक्झरी बसच्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. डहाणूतील महालक्ष्मीजवळ हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने शासकीय रुग्णालय कासा येथे दाखल करण्यात आले आहे.

अपघात इतका भीषण होता की बस आणि कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

Palghar Accident
Fraud Case: हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली लाखोंचा गंडा; नागरिकांकडून पैसे लुटायचा आणि गर्लफ्रेंडवर उधळायचा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतील महालक्ष्मीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गुजरातहून एक कार मुंबईच्या दिशेनं येत होती. डहाणूजवळ पोहोचले असता अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेनं येणाऱ्या भरधाव लक्झरी बसवर कार आदळली.हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे.

Palghar Accident
Kalyan Crime : ३२ वर्षीय महिलेकडून नववीच्या मुलावर अत्याचार; कल्याणमधील धक्कादायक घटना

अपघातात कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर या अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले आहे. बसचालक या अपघातात जखमी झाला आहे.

कारमधील चारही प्रवासी हे गुजरातच्या बारडोली मधील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com