Britain Politics Saam tv
देश विदेश

Britain Politics: ब्रिटनच्या राजकारणात मोठी घडामोड; पंतप्रधान सुनक यांच्याकडून भारतीय वंशाच्या गृहमंत्र्यांची पदावरून हकालपट्टी

Britain political News in Marathi : ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना इस्त्रायल-हमास युद्धाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान कार्यालयाची अवहेलना करणे महागात पडलं आहे.

Vishal Gangurde

Britain political News in Marathi :

ब्रिटनच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांना इस्त्रायल-हमास युद्धाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान कार्यालयाची अवहेलना करणे महागात पडलं आहे. त्यांनी लंडनचं पोलीस दल पॅलेस्टाईन समर्थक असल्याचा आरोप केला होता. लंडन पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची पदावरून हकालपट्टी केल्यानंतर पंतप्रधान सुनक यांच्याकडून नव्या गृहमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या सर्व राजकीय घडामोडीनंतर ब्रिटेनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे डेव्हिड कॅमेरन यांची सात वर्षांनी राजकारणात पुन्हा एन्ट्री झाली आहे. तर जेम्स क्लेवर्ली यांची गृहमंत्रिपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डेव्हिड कॅमेरन हे २०१० ते २०१६ या सालात ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर होते. ब्रिटनमधील ब्रेक्झिट सार्वमताच्या निकालानंतर डेव्हिड कॅमेरन यांना राजीनामा द्यावा लागला होता.

ब्रिटनच्या राजकारण फेरबदल झाल्यानंतर लंडनचे महापौर सादिक खान म्हटले की, 'कन्झर्व्हेटिव्ह पक्षाची ही जुनी कथा आहे. ब्रिटनच्या कॅबिनेटमध्ये बदल करण्याची गरज नव्हती. खरंतर आता देशात निवडणुका झाल्या पाहिजेत'.

सुएला ब्रेव्हरमन हे ब्रिटनच्या राजकारणातील वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. सुएला ब्रेव्हरमन यांनी एका लेखात लंडनच्या पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी या लेखात लंडन पोलीस पॅलेस्टाईन समर्थक असल्याचा आरोप केला होता.

काही दिवसांपूर्वी पॅलेस्टाईन समर्थकात एक आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखलं. यामुळे सुएला भडकल्या. यानंतर त्यांनी एका लेखात लंडन पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने आंदोलकांना रोखल्याचा आरोप केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT