मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. 15 नोव्हेंबरला प्रचार संपण्यापूर्वी शेवटच्या दिवसांमध्ये नेत्यांकडून जोरदार निवडणुकीचे कार्यक्रम आखले जात आहेत. दरम्यान, एडीआर आणि मध्य प्रदेश इलेक्शन वॉचने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत 2023 मध्ये पुन्हा निवडणूक लढवत असलेल्या192 आमदारांच्या शपथपत्रांचे विश्लेषण केले. जाणून घेऊया या अहवालातून काय माहिती समोर आली आहे...
या निवडणुकीत पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या 192 आमदारांपैकी 180 म्हणजेच 94 टक्के आमदारांची संपत्ती 1 टक्क्यांवरून 1982 टक्क्यांवर पोहोचली आहे. तसेच 12 आमदार म्हणजे सहा टक्के ज्यांची संपत्ती घटली आहे. 12 आमदारांच्या संपत्तीत 1 टक्क्यांवरून 64 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या आमदारांच्या मालमत्तेत सरासरी 50 टक्के वाढ
वर्ष 2018 मध्ये, अपक्षांसह विविध पक्षांनी मैदानात उतरलेल्या या 192 आमदारांची सरासरी मालमत्ता 11.91 कोटी रुपये होती. आता 2023 च्या निवडणुकीत या 192 आमदारांची सरासरी मालमत्ता 17.81 कोटी रुपये झाली आहे. अहवालानुसार, 2018 ते 2023 मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान या आमदारांच्या संपत्तीत सरासरी 5.90 कोटी रुपये किंवा 50 टक्के वाढ झाली आहे. (Latest Marathi News)
या पाच आमदारांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ
रतलाम शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चैतन्य कश्यप यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. 2018 मध्ये त्यांची संपत्ती 204.63 कोटी रुपये होती. जी 2023 मध्ये वाढून 296.08 कोटी रुपये झाली. तर तेंदुखेडा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 2018 मध्ये संजयची संपत्ती 130.97 कोटी रुपयांवरून 212.52 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंदूर-1 मतदारसंघातील काँग्रेसचे संजय शुक्ला आहेत. शुक्ला यांची संपत्ती 2018 मध्ये 139.93 कोटी रुपये होती, ती आता 217.41 कोटी रुपये झाली आहे. चौथा क्रमांक काँग्रेसच्या विशाल पटेल यांचा आहे. 2018 मध्ये देपालपूरच्या आमदाराची संपत्ती 69 कोटी रुपये होती, ती आता 141 कोटी रुपये झाली आहे. शिवपुरी मतदारसंघातील काँग्रेसचे केपी सिंह (कक्का जू) सर्वाधिक संपत्तीत पाचव्या क्रमांकावर आहेत. 2018 मध्ये केपी सिंह यांची संपत्ती 73 कोटी रुपये होती, ती वाढून 140 कोटी रुपये झाली आहे.
भाजपचे आमदार सर्वात श्रीमंत
पक्षनिहाय 2018 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान, 100 भाजप आमदारांची सरासरी मालमत्ता 11 कोटी रुपये होती, ती वाढून 15 कोटी झाली आहे. काँग्रेसच्या 88 आमदारांची सरासरी संपत्ती 12 कोटींवरून 22 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 2018 मध्ये पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या बसपाच्या दोन आमदारांची सरासरी मालमत्ता 4 कोटी रुपये होती. जी आता वाढून 7 कोटी रुपये झाली आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची संपत्ती वाढली की घटली?
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या संपत्तीत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय राज्याचे माजी सिंह कमलनाथ यांच्याकडे 9 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.