UJJAIN NAGCHANDRESHWAR TEMPLE CROWD 3 DEVOTEES INJURED ON NAG PANCHAMI  saam tv
देश विदेश

उज्जैनच्या मंदिरात चेंगराचेंगरीची स्थिती; नागचंद्रेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; ३ जण जखमी

Ujjain Mahakal Temple Area Stampede-Like Situation: नागपंचमीनिमित्त उज्जैनमधील नागचंद्रेश्वर, हरसिद्धी आणि बडे गणेश मंदिरांच्या परिसरात प्रचंड गर्दीमुळे झाल्यानं चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झालीय. भाविकांच्या गर्दीमुळे झालेल्या रेटारेटीत तीन भाविक जखमी झालेत

Bharat Jadhav

  • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी

  • नागचंद्रेश्वर मंदिरात चेंगराचेंगरीची स्थिती तीन भाविक जखमी

  • नागपंचमीला उज्जैन मंदिर परिसरात भाविकांची तोबा गर्दी

मध्य प्रदेशातील उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराच्या परिसरातील नागचंद्रेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. नागपंचमीनिमित्त भाविकांनी दर्शनांसाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे नागचंद्रेश्वर मंदिर,हरसिद्धी मंदिर आणि बडे गणेश मंदिर परिसरात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.

जखमींना रुग्णालयात दाखल केलं

मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. अनेकांची मोठी धक्काबुक्की झाली. या गोंधळाच्या आणि चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीत, चिरडले गेल्यामुळे तीन जण गंभीर जखमी झालेत. चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली.

सर्व जखमींना तातडीने प्रथमोपचार देण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सणासुदीच्या काळात सुरक्षा आणि गर्दीच्या नियोजनाबाबत प्रशासनाकडून आता विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

भगवान नागचंद्रेश्वर यांचे पवित्र स्थान मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसराच्या तिसऱ्या मजल्यावर स्थित आहे. या मंदिराचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे दरवाजे वर्षातून केवळ एकदाच उघडले जातात. नागपंचमीच्या दिवशी पूर्ण २४ तासांसाठी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. त्यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या दिवसाव्यतिरिक्त, उर्वरित वर्षभर हे मंदिर भाविकांसाठी बंद असते.

दुर्मिळ मूर्ती

मंदिराच्या गर्भगृहात विराजमान असलेली ही ११ व्या शतकातील मूर्ती म्हणजे कला आणि श्रद्धा यांचा एक भव्य संगम आहे. येथे, देवाधिदेव भगवान महादेव आणि माता पार्वती हे दहा ते अकरा फणे असलेल्या एका विशाल शेषनागाच्या छायेखाली विराजमान आहेत. या मनोहारी रूपात त्यांच्यासोबतच, सर्वप्रथम पूजले जाणारे दैवत भगवान गणेशही पाहायला मिळतात. भगवान शिवाचे असे अद्वितीय रूप जगात अन्यत्र कोठेही आढळत नाही, अशी मान्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Colleges: मोठी बातमी! राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार, सरकारकडून हालचालींना वेग

Maharashtra News Live Update: मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन; 9 तासांनंतर तरुण टॉवरवरून खाली

Team Tukaram Mundhe: प्रीती झिंटाचा तुकाराम मुंढेंना पाठिंबा; अभिनेत्रीच्या टी-शर्टची सोशल मीडियावर रंगली चर्चा

Ganesh Chaturthi 2026 : 14 सप्टेंबरला दोन सण एकाच दिवशी! उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या योग्य वेळ

Satara Crime: तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राचार्याविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT