UGC-NET Paper Leak 
देश विदेश

UGC-NET : परीक्षेच्या एका दिवसआधी UGC-NET पेपर लीक झाला; सीबीआयचा खुलासा

UGC-NET Paper Leak: UGC-NET परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिलीय. पेपर लीक प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केलाय.

Bharat Jadhav

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेतली जाणारी यूजीसी-नेट परीक्षेला रद्द करण्यात आलंय. या परीक्षेवरुन देशभरात वाद निर्माण झालाय. परीक्षेतील अनियमिता झाल्यानंतर पेपर रद्द करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली. दरम्यान या पेपर लीक प्रकरणाचा तपास सीबीआयला करत असून त्यांनी यासंदर्भात मोठा खुलासा केलाय.

यूजीसी-नेटचा पेपर परीक्षेच्या एका दिवसाआधीच लीक झाल्याचे सीबीआयने तपासानंतर सांगितलं. परीक्षेपूर्वी पश्नपत्रिका डार्कनेटवर अपलोड करण्यात आली होती, असं सीबीआयने सांगितलं. यूजीसी नेट परीक्षेचा पेपर कोठून लीक झाला याचा शोध सीबीआयकडून घेतला जात आहे. सीबीआयच्या प्राथमिक तपासानुसार सोमवारी (17 जून) प्रश्नपत्रिका लीक झाली होती, त्यानंतर ती एनक्रिप्टेड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आली होती.

पकडले जाऊ नये म्हणून आरोपींनी फुटलेली प्रश्नपत्रिका डार्कनेटवर टाकली होती. दरम्यान सीबीआय या प्रकरणाशी संबंधित तपशील गोळा करण्यासाठी एनटीए आणि इतर एजन्सींच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. शिक्षण विभागाने बुधवारी NTA द्वारे घेतलेली UGC-NET परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास तातडीने सीबीआयकडे सोपवण्यात आला.

UGC-NET परीक्षा पुन्हा घेतली जाईल. त्यासाठी तारखा आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी (20 जून) दिली. UGC-NET परीक्षेद्वारे, भारतीयांची पात्रता कनिष्ठ संशोधन फेलोशिप, सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये पीएचडी प्रवेशासाठी निश्चित केली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT