Edu Ministry: ब्रेकिंग! विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रांवर मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्या; शिक्षण मंत्रालय

Give Sanitary Pads At Board Exam Centres: विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रांवर मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्या, असा सल्ला शिक्षण मंत्रालयाने दिला आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनींना होणार त्रास लक्षात घेवून शिक्षण विभागाने या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं आहे.
 सॅनिटरी पॅड
Sanitary Pads At Board Exam CentresSaam Tv
Published On

विद्यार्थिनींसाठी एक खुशखबर आहे. शिक्षण मंत्रालयाने शाळांना दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रांवर मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींसाठी अधिक समावेशक आणि आश्वासक वातावरण निर्माण करणे, असा आहे. सॅनिटरी नॅपकिनचा वापर मर्यादित असलेल्या ग्रामीण भागातील मुलींसाठी हा उपक्रम विशेषतः फायदेशीर ठरेल, असे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांनी (Edu Ministry) म्हटलंय की, त्यांना याबाबत शाळा, पालक किंवा विद्यार्थी यांच्याकडून कोणत्याही विशिष्ट विनंती प्राप्त झाल्या नाहीत. मागील गुरुवारी जारी करण्यात आलेल्या ॲडव्हायझरीमध्ये म्हटलंय की, विद्यार्थ्यांना परीक्षा संपेपर्यंत वर्ग सोडण्याची परवानगी नसते. परंतु, बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या गरजेनुसार विश्रांती द्यावी.

विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी मासिक पाळीतील स्वच्छता महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या शैक्षणिक कामगिरीमध्ये अडथळा आणू नये, यावर भर देण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना मासिक पाळीतील आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या (Sanitary Pads At Board Exam Centres) आहेत.

परीक्षेदरम्यान मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या समस्यांचे निराकरण करून, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या गरजा आणि आत्मविश्वासाने परीक्षेत सहभागी होता यावे. त्यांची शैक्षणिक क्षमता साध्य करण्यासाठी सक्षम बनविणे, यासाठी प्रयत्न करत (Board Exam Centres) आहे.

 सॅनिटरी पॅड
Sanitary Napkins : सॅनिटरी नॅपकिनमुळे होऊ शकतो कॅन्सर, याप्रमाणे करा योग्य पॅडची निवड

पवई शाळेच्या मुख्याध्यापकांनी आश्वासन दिलंय की, परीक्षा केंद्रांवर सॅनिटरी पॅड प्रदान करणे ही समस्या उद्भवणार नाही. विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारे पाठिंबा देण्यासाठी ते तयार (Sanitary Pads) आहेत. राज्यातील नऊ हजारहून अधिक सरकारी शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन विक्री आणि विल्हेवाट लावण्याची मशीन तयार आहेत. मासिक पाळीच्या समस्यांना विद्यार्थिनींना सामोरे जावे लागत असले, तरी त्यांनी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परिक्षेत मुलांपेक्षा दमदार कामगिरी केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 सॅनिटरी पॅड
Free Sanitary Pads in School: मोठी बातमी! सर्व विद्यार्थिनींना मिळणार मोफत 'सॅनिटरी पॅड', शाळा -शैक्षणिक संस्थांना सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com