Sanitary Napkins : सॅनिटरी नॅपकिनमुळे होऊ शकतो कॅन्सर, याप्रमाणे करा योग्य पॅडची निवड

अनेक कंपन्या सॅनिटरी नॅपकिन बनवताना रासयनिक पदार्थांचा वापर करतात.
Sanitary Napkins
Sanitary NapkinsSaam Tv
Published On

Sanitary Napkins : नुकतेच भारतात विकल्या जाणाऱ्या सॅनटरी नॅपकीनमध्ये रसायनांचा अधिक वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व रसयानांच्या अधिक वापरामुळे महिलांना हृदयविकार, मधुमेह आणि कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'टॉक्सिक लिंक' या एनजीओने केलेल्या संशोधनात ही महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

यासाठी सावध राहण्याची गरज आहे. प्रसिद्ध कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकिन्स भारतात बनतात, असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे नॅपकिन्समुळे कॅन्सरसारखे घातक आजार होऊ शकतात. अनेक कंपन्या सॅनिटरी नॅपकिन बनवताना रासयनिक पदार्थांचा वापर करतात ज्यामुळे कॅन्सर होण्यासोबतच महिलांना वंध्यत्वही येऊ शकते. या व्यतिरिक्त मधुमेह आणि हृदयविकार होण्याचा धोका देखील वाढतो. आपण आतापर्यंत बाजारात विकले जाणारे सॅनिटरी पॅड्स रंगीबेरंगी पॅकेट्समध्ये न तपासता विकले गेले आहे.

Sanitary Napkins
Sanitary Napkin : सॅनटरी नॅपकीनमध्ये रसायनांचा अधिक वापर; महिलांना होऊ शकतात 'हे' आजार

संशोधन काय म्हणते?

दिल्लीस्थित एनजीओ टॉक्सिक्स लिंकने आयोजित केलेला अभ्यास, आंतरराष्ट्रीय प्रदूषण निर्मूलन नेटवर्कच्या चाचणीचा एक भाग आहे, ज्यामध्ये भारतात विकल्या जाणार्‍या 10 ब्रँडच्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या उत्पादनांचा समावेश आहे. अभ्यासादरम्यान, संशोधकांना सर्व नमुन्यांमध्ये phthalates आणि volatile organic compounds (VOCS) चे अंश आढळले. हे दोन्ही दूषित घटक कर्करोगाच्या पेशी निर्माण करण्यास सक्षम आहेत ही चिंतेची बाब आहे. हे संशोधन 'मेन्स्ट्रुअल वेस्ट 2022' या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्वचेवर Phthalates रासायनिक संपर्कामुळे कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग होतो आणि प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. त्याचवेळी, VOCs च्या प्रदर्शनामुळे मानसिक क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे दमा आणि काही प्रकारचे कर्करोग देखील होऊ शकतात. याशिवाय त्याचा प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. रिसर्च टीमने सांगितले की खरं तर, या गंभीर रसायनांचा योनीच्या त्वचेवर व स्त्रीच्या शरीराच्या इतर भागांच्या त्वचेच्या तुलनेत जास्त असतो. त्यामुळे हा धोका अधिकच वाढतो.

भारतात किती महिला सॅनिटरी पॅड वापरतात

एका अहवालानुसार, भारतातील 15 ते 24 वयोगटातील 64.4 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. मागील सॅनिटरी पॅड्सबाबत वाढलेल्या जागरूकतेमुळे त्यांचा वापर वाढला आहे. मासिक पाळीच्या काळात अनेक गंभीर आजार टाळण्यासाठी सॅनिटरी पॅडचा वापर केला जातो. पण संशोधनादरम्यान सॅनिटरी नॅपकिन्समध्ये आढळणारी रसायने आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. म्हणूनच महिलांनी सॅनिटरी पॅड निवडताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि धोकादायक पदार्थ असलेली उत्पादने खरेदी करू नका.

Sanitary Napkins
Period Pain : १० मिनिटांत थांबेल पीरियड्सची वेदना, पेन किलरपेक्षा 'या' २ गोष्टी जास्त फायदेशीर

योग्य सॅनिटरी पॅड कसे निवडायचे ?

सध्याच्या काळात कपडे, पिशव्या, शूज, घरगुती कोणतेही खरेदी करण्याची गोष्ट आली तर आपण सहज इंटरनेटवर सर्च करुन घेतो. परंतु, जेव्हा सॅनिटरी पॅडचा वापर करताना त्याच्या लोकप्रिय ब्रँडवरुन आपण त्याची खरेदी करतो. आपण खरेदी करत असलेले सॅनिटरी पॅड्स योग्य आहेत का हे तपासून पहा. येथे आम्ही तुम्हाला योग्य सॅनिटरी पॅड निवडण्याचे मार्ग सांगत आहोत, हे लक्षात ठेवून तुम्ही पुढील खरेदी कराल.

Sanitary Napkins
Sanitary NapkinsCanva

1. सेंद्रिय सॅनिटरी पॅड निवडा

भारतात बनवलेल्या मोठ्या कंपन्यांच्या सॅनिटरी पॅडमध्येही घातक रसायने असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महिला केमिकल फ्री ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्सच खरेदी करावेत. आजकाल अनेक कंपन्यांचे सेंद्रिय सॅनिटरी पॅड बाजारात उपलब्ध आहेत बायोडिग्रेडेबल होणारे पॅड पर्यावरणासाठी (Environment) देखील चांगले असतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉटनचे सॅनिटरी पॅड देखील वापरू शकता.

2. सुवासिक सॅनिटरी पॅड नको

कमी पैशात मिळणारे अधिक पॅड खरेदी करण्याआधी त्यात दिलेली माहिती वाचल्यानंतर योग्य पॅड निवडा. सुगंधित नॅपकिन्सना फसू नका. अनेकदा जाहिरातीच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड्सबद्दल माहिती दिली जाते. त्यांचा अशा दावा आहे हे पॅड वापरल्यास दिवसभर सुंगधित व फ्रेश वाटेल. असे पॅड खरेदी करण्यापूर्वी त्याची योग्य माहिती घ्या.

3. हे पॅड तुमच्यासाठी खूप धोकादायक

वास्तविक, सॅनिटरी नॅपकिन्स द्रव-शोषक सामग्रीपासून बनविलेले असतात जे ओलावा अवरोधित करतात आणि अधिकाधिक रक्त शोषण्यासाठी उष्णता निर्माण करतात. सुगंधित सॅनिटरी नॅपकिन्स जास्त काळ वापरल्याने पॅडमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढते. तसेच, अशा पॅडच्या वरच्या थरात सुगंध निर्माण करण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर केला जातो, ज्याचा तुमच्या योनीच्या नाजूक त्वचेवर वाईट परिणाम होतो.

4. सिंथेटिक पॅड वापरणे टाळा

सॅनिटरी पॅड खरेदी (Shopping) करताना सिंथेटिक पॅड वापरणे टाळा कारण त्यांचा कठोर आणि रासायनिक आधार योनीच्या नाजूक त्वचेसाठी हानिकारक आहे. तुमच्या रक्तप्रवाहावर आधारित पॅड निवडा. नेहमी पुरळ नसलेले सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी करा.

पीरियड्सदरम्यान आणि सॅनिटरी पॅड वापरताना या चुका करणे टाळा

  • मासिक पाळीत दर चार ते पाच तासांनी पॅड बदला.

  • दिवसभर एकच पॅड वापरू नका.

  • पॅड बदलतानाही तुमची योनी पाण्याने स्वच्छ धुवा.

  • योग्य सॅनिटरी पॅडसह योग्य अंडरवेअर वापरणे देखील महत्त्वाचे आहे, विशेषत: मासिक पाळी दरम्यान.

  • तर नेहमी कॉटन पँटी निवडा कारण ती हवा सहजतेने जाऊ देते.

  • तसेच मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळावा यासाठी रेन किलरसारख्या औषधांचा वापर करू नका, उलट गरम पाण्याने आंघोळ करा किंवा वेदनादायक भागाला गरम पाण्याचा शेक द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com