eknath shinde and uddhav thackeray  saam tv
देश विदेश

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची निवडणूक फंडासाठी दिल्लीत मोठी डील? शिंदे गटाचा गंभीर आरोप, दक्षिण आफ्रिकेचं कनेक्शनही सांगितलं

Naresh Mhaske News : उद्धव ठाकरेंची निवडणूक फंडासाठी दिल्लीत मोठी डील केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाने गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौरा निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी केल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाने केला आहे. ठाकरेंनी निवडणुकीच्या फंडासाठी अब्जावधी घोटाळ्याचा आरोप असलेल्या गुप्ता बंधूंची भेट घेतल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ७ तारखेला दुपारी भेट घडवून आणल्याचाही आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. म्हस्के यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी म्हस्के म्हणाले, 'उद्धव ठाकरे सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला. मला मुख्यमंत्री करा, असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते. पण काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःचं राजकीय महत्व वाढवणे आणि उद्धव ठाकरे यांना मी कस नाचवू शकतो हे दाखवणारा हा दौरा होता.

'निवडणुकीत फंड गोळा करण्यासाठी हा दौरा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणणारा हा दौरा होता. ते काही महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आले होते', असे म्हस्के म्हणाले.

'सरकारला कळू नये, यासाठी हा दिल्ली दौरा असेल. राऊतांनी ही भेट घडवून आणली. ही भेट कशासाठी झाली, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. ज्या माणसाने एका देशाला फसवलं, त्याची भेट का घेतली? त्यांच्या घरातील सीसीटीव्ही बंद केले असतील, तर रस्त्यावरील सीसीटीव्ही किंवा त्यांचे फोन तपासा, असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला.

कोण आहेत गुप्ता बंधू ?

आफ्रिकन देशाच्या मालकीच्या सरकारी उद्योगांमधून अब्जावधींची लूट केल्याचा गुप्ता बंधूंवर आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अतुल गुप्ता, अजय गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी जवळीक साधली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत अब्जावधी रँड्सचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जेकब झुमा २०१८ मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाले. त्यानंतर तिघे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईला पळून गेले होते. तिथे तिघांना अटक झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT