Udayanraje Bhosale Saam Tv
देश विदेश

Udayanraje Bhosale : मला नाही वाटत माझं रेकाॅर्ड काेण ताेडेल : उदयनराजे भाेसले (व्हिडिओ पाहा)

खासदार उदयनराजे भाेसले यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.

Siddharth Latkar

दिल्ली : लाेकांची कामं झाली पाहिजेत अशी अपेक्षा जनतेची असती. ती जर हाेत नसतील पदावर राहून काय उपयाेग. बहुधा त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबराेबर माेठ्या संख्येेने लाेकप्रतिनिधी ठामपणे उभी राहिली आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्राचा विकास निश्चित करतील असं मत खासदार उदयनराजे भाेसले यांनी दिल्लीत माध्यमांशी बाेलताना व्यक्त केले. (Udayanraje Bhosale Latest Marathi News)

यापुर्वी (मविआ) माेठ्या प्रमाणात भेदभाव केला जात हाेता. माझ्याबाबत देखील हेच घडलं हाेते. माझी एकही फाईल मंजूर केली गेली नाही अशी खंत खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केली. त्यामुळेच त्यांची (मविआ) ही अवस्था झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात माेठ्या संख्येने लाेक का येताहेत याचा विचार करा असेही राजेंनी नमूद केेले.

माझं रेकाॅर्ड काेण ताेडेल ?

निवडणुकीपुर्वी शेवटच्या तीन महिन्यांत अनेकांनी राजीनामा दिले पण लाेकसभा निवडणुक झाल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात राजीनामा देणारे मी एकमेव असेन. मला नाही वाटतं माझं हे रेकाॅर्ड काेण ताेडेल असेही खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले काम हाेत नसेल तर लाेकांसमाेर जायचे कसं. काय सांगायचं. काम हाेत नसतील तर बाजूला झालेलं बरं असेही राजेंनी नमूद केलं.

संजय राऊत देव

संजय राऊत (Sanjay Raut) हे तर देव आहेत. त्यांच्याबाबत बाेलून मला माझा ताेंड खराब करायचे नाही असे राजेंनी नमूद केले. ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साता-याचे (satara) आहेत. ज्यावेळी ते आमदार नव्हते त्यावेळेपासून त्यांचे आणि आमचे संबंध आहेत असे उदयनराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Maharashtra Politics: शिवसेनेत उलथापालथ! भास्कर जाधवांच्या निकटवर्तीयाची ठाकरे गटातून हकालपट्टी; कोकणात राजकीय भूकंप

Shocking : दुर्दैवी घटना! देवदर्शनाला गेलेल्या तरुणावर काळाचा घाला, समुद्रात बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचवलं

SCROLL FOR NEXT