Rajouri Encounter News Saam Tv
देश विदेश

Kashmir Encounter : राजौरी चकमकीत मोठं यश, भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना केलं ठार

Rajouri Encounter : राजौरी चकमकीत मोठं यश, भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना केलं ठार

Satish Kengar

Rajouri Encounter :

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. यात दोन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले आहेत. यातील एका दहशतवाद्याची ओळख कारी नावाने झाली असून तो बॉम्ब बनवण्यात कुशल होता. याशिवाय तो स्नायपरही होता.

लष्कर-ए-तैयबाच्या प्रमुख कमांडरांपैकी एक असलेला कारी दीर्घकाळापासून सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरला होता. राजौरीतील कालाकोटमध्ये कालपासून सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत सैन्याच्या दोन मेजरसह 4 जवान शहीद झाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कालपासून सुरु असलेलीही चकमक बुधवारी रात्री थांबण्यात आली होती. मात्र आज सकाळी सुरक्षा दलांनी पुन्हा चकमक सुरू केली, ज्यामध्ये दोन पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. राजौरीतील कालाकोट जंगलात ही चकमक सुरु आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाची नवी लाट निर्माण करण्यासाठी पाकिस्तानस्थित दहशतवादी कारी याला लष्कराच्या नेत्यांनी पाठवले होते. तो आयईडी बनवण्यात हुशार होता, असे सांगितले जाते. याशिवाय तो बराच काश्मीरमध्ये लपून दहशतवादी कारवाया करत होता.  (Latest Marathi News)

जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तो एक प्रशिक्षित स्नायपर होता. यावरून एका मोठ्या दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना कितपत यश आले आहे, हे समजू शकते. त्याला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. लष्कर-ए-तैयबाच्या वरिष्ठ कमांडरमध्येही त्याचा समावेश होता. गेल्या एक वर्षापासून तो राजौरी पुंछ परिसरात दहशतवाद पसरवण्यात गुंतला होता. तो डांगरी आणि कांडी येथील दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड असल्याचे मानले जात आहे. गुप्त माहितीच्या आधारे सैन्य आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली तेव्हा ही चकमक सुरू झाली.

दरम्यान, कालाकोटच्या जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर परिसराला घेराव घालण्यात आला आणि त्यानंतर चकमक सुरू झाली. हा परिसर जंगलांनी वेढलेला आहे, त्यामुळे दहशतवाद्यांशी सामना करणे कठीण होते. जम्मू-काश्मीरमधील पीर पंजाल जंगल हे सुरक्षा दलांसाठी फार पूर्वीपासून आव्हान आहे. दहशतवादी अनेकदा येथे आपले तळ बनवतात. त्यामुळे चकमकींमध्येही सुरक्षा दलांना अडचणी येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT