वॉशिंग्टन: अमेरिकेत 6 जानेवारी रोजी कॅपिटल हिल (संसद) (Capital Hill Violance) येथे झालेल्या हिंसाचारादरम्यान, सुरक्षेशी संबंधित आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याआधी दोन पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःचा जीव घेतला होता. कोलंबिया पोलीस विभागाने सांगितले महानगर पोलीस अधिकारी गुंथर हाशिदा त्यांच्या घरात मृत अवस्थेत आढळले. त्यांनी आत्महत्या केली आहे. गुंथर मे 2003 मध्ये कोलंबिया पोलिस दलात सामील झाले होते. आणखी एक महानगर पोलीस अधिकारी, काइल डिफ्रेटॅग, 10 जुलै रोजी मरण पावले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनीही आत्महत्याही केली आहे. 2016 पासून ते पोलीस खात्यात कार्यरत होते.
अलीकडेच, एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात म्हटले होते की अमेरिकेत 6 जानेवारी रोजी कॅपिटल हिल (संसद) हिंसाचारानंतर पोलीस विभागात मोठ्या कारवाईची भीती आहे. आतापर्यंत 70 पोलिसांनी नोकरी सोडली आहे. कॅपिटल हिल पोलीस युनियनचे अध्यक्ष गुस पापाथनासियू म्हणाले की अधिकारी निराश झाले आहेत आणि परिस्थितीवर उपाय शोधण्याचा मार्ग शोधत आहेत. त्यांना तपासाच्या दीर्घ तासांमध्ये तणावासह जगण्याची इच्छा नाही. एफबीआयचे प्रमुख क्रिस्टोफर व्रे म्हणाले की, अमेरिकन संसद भवनातील जानेवारीमध्ये झालेला हिंसाचार हा "देशांतर्गत दहशतवादाचा" परिणाम होता.
दरम्यान अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पराभवानंतर ट्रम्प यांच्या भाषणानंतर त्यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर हल्ला केला होता. येथे झालेल्या भीषण हिंसाचारात चार जण ठार झाले होते. शेकडो पोलिस जखमी झाले होते. आता या घटनेचा तपास सुरू आहे. तपासात त्या पोलीस अधिकाऱ्यांना जे त्या वेळी सुरक्षेसाठी तैनात होते त्यांचीही चौकशी केली जात आहे. असे मानले जाते की मानसिक दडपणामुळे या घटना घडत आहेत. या हल्ल्यानंतर लगेच पाचशे लोकांना अटक करण्यात आली होती.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.