Nitish Kumar and Rahul Gandhi Saam TV
देश विदेश

नितीश कुमार आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दोन मराठी नेते मैदानात; भाजपने आखली नवी रणनीती

नितीश कुमार यांनी दिलेला धक्का भाजपचा चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भाजपनं आता बिहारकडे लक्ष दिल्याचं दिसून येतं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे -

मुंबई: भाजपनं (BJP) विविध राज्यातील प्रभारी आणि सहप्रभारी पदाच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विनोद तावडे (Vinod Tawde) यांना बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत तावडे यांनी बिहारमध्ये पक्षाचं काम पाहिलं आहे. (Bihar Assembly Elections)

नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी एनडीएतून बाहेर पडून लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी सोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी दिलेला धक्का भाजपचा चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भाजपनं आता बिहारकडे लक्ष दिल्याचं दिसून येतं आहे.

पाहा व्हिडीओ -

तर प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. जावडेकर यांचे मंत्रीपद गेल्यानंतर ते अडगळीत पडले होते परंतु आता पुन्हा त्यांच्यावर पक्षानं नवी जबाबदारी दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) केरळमधूनच खासदार आहेत.

काँग्रेस (Congress) आणि डावे पक्षांचा पगडा असलेल्या केरळचे आव्हान जावडेकरांच्या खांद्यावर आले आहे. राष्ट्रीय महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांना राजस्थानचे सहप्रभारी केले आहे. तर पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मध्य प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

दरम्यान, विरोधकांचा भावी पंतप्रधान पदाचा नेता म्हणून सध्या नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत आणि या दोन दिग्गज नेत्यांच्या विरोधात रणनीती ठरविण्यासाठी आता भाजपने दोन मराठी चेहऱ्यांची निवड केल्यामुळे भाजपची मराठी नेत्यांवर मदार असल्याचं दिसून येतं आहे.

भाजपने जाहीर केलेल्या नियुक्त्या -

विनोद तावडेः बिहार, प्रभारी.

प्रकाश जावडेकरः केरळ, प्रभारी.

विजय रहाटकरः राजस्थान, सहप्रभारी.

पंकजा मुंडेः मध्य प्रदेश, सहप्रभारी.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वरळीमधून आदित्य ठाकरे यांचा विजय

'Bigg Boss 18' च्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट, बिग बॉसची भविष्यवाणी ठरली खोटी

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी, 80 टक्के जागांवर फुलले कमळ, असा विजय कधीच मिळाला नाही

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

SCROLL FOR NEXT