'मी सुभाषचंद्र बोसवादी, पण गांधीवादी नाही'; अभिनेत्री कंगना रनौतचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

कंगना दिल्लीतील राजपथ – कर्तव्य पथच्या उद्घाटनाला आली होती. त्यावेळी कंगनाने स्वत:ला सुभाषचंद्र बोसवादी असल्याचे सांगितले.
Kangana Ranaut News
Kangana Ranaut News saam tv
Published On

Kangana Ranaut News : अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. कंगना नेहमी सिनेमासृष्टीवरील वादावर बेधडक मत व्यक्त करताना दिसते. तर अनेकदा राजकीय नेत्यांवर सडकून टीका करताना दिसते. अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा तिच्या वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात अकडली आहे. कंगना दिल्लीतील राजपथ – कर्तव्य पथच्या उद्घाटनाला आली होती. त्यावेळी कंगनाने स्वत: सुभाषचंद्र बोसवादी असल्याचे सांगितले. तसेच कंगनाने यावेळी काँग्रेस नेत्यांनाही ललकारलं.

Kangana Ranaut News
Yashoda Teaser : समंथा दिसणार प्रेग्नंट लेडीच्या भूमिकेत; अ‍ॅक्शन, थ्रिलर, सस्पेंसने भरलेला 'यशोदा'चा टीझर लॉन्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'सेंट्रल विस्टा अव्हेन्यू' प्रकल्पाचे उद्घाटन केले. तसेच मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे देखील अनावरण केले. या सोहळ्यास बॉलिवूडच्या कलाकरांनी देखील हजेरी लावली. या सोहळ्याला अभिनेत्री कंगना रनौतने देखील हजेरी लावली. त्यावेळी कंगनाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तिने काँग्रेस पक्षातील नेत्यांना ललकारलं.

कंगना रनौत म्हणाली, 'मी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी अनेकदा उघडपणे बोलते. मी अनेकवेळा सांगितले आहे की, 'मी गांधीवादी नाही, कारण मी सुभाषचंद्र वादी आहे. मी त्यांच्यापैकी एक आहे, जे 'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल' या घोषणेवर विश्वास ठेवतात'.

Kangana Ranaut News
महानायक अमिताभ बच्चन यांनी नाकारले होते महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निमंत्रण, जाणून घ्या काय होते कारण?

कंगना पुढे म्हणाली, 'आज ऐतिहासिक दिवस आहे. या सोहळ्याचा मी भाग झाले, हे माझे भाग्य मानते. आपल्याला स्वातंत्र्य हे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या सारख्या क्रांतीकारक वीर सावरकर यांच्यामुळे मिळालं आहे. स्वातंत्र्य हे विनवणी करून मिळालं नसून आपल्या हक्कामुळे मिळालं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com