देश विदेश

Viral Video: भर रस्त्यात तरुणींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाला कुटला

नरेश शेंडे

क्षुल्लक कारणावरून लोकांमध्ये वाद-विवाद होत असल्याचं आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी पाहतो. हल्ली तर तरुण मुलींमध्ये जोरदार भांडण होत असल्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. कधी प्रियकरावरून, कधी ट्रेन मध्ये तर कधी आपआपसातील जलसी वृत्तीमुळं तरुणींमध्ये कडाक्याचं भांडण होत असतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून झालेली भांडणं विकोपाला गेल्याचेही अनेक उदाहरणं देता येतील.

दोन तरुणींमध्ये भर रस्त्यातच भांडण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ खूप मजेशीर आहे. कारण भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला दोघींनी कुटला आहे. दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटत असताना हा तरुण मध्यस्थी करायला गेला होता खरा... पण भांडण सोडवणं या तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. (two girls fight on road beaten a man badly video viral)

नेमकं काय घडलं?

दोन तरुणींचं भररस्त्यात भांडण सुरु असताना एक जण मध्यस्थी करायला जातो. त्यांचं भांडण सोडवायला जाणं हे त्यांच्याच अंगलट येईल, याची त्याला जराही कल्पना नव्हती. व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता की, दोन तरुणी चालत चालत एकमेकींच्या जवळ येतात. त्यानंतर काही कारणामुळं दोघींमध्ये जोरदार भांडण सुरु होतं.

दोघी एकमेकिंना अशा भिडतात की एकमेकींच्या झिंज्याच उपटतात. ट्रॅक सूट घातलेली तरुणी दुसऱ्या तरुणीला जमिनीवर खाली पाडून मारत असते. याचदरम्यान, एक तरुण त्यांचं भांडण सोडवायला जातो. पण दोघी एवढ्या रागात असतात की, मध्यस्थी करायला आलेल्या तरुणालाच कुटतात.

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विटरवर @Baharikekalesh या नावाच्या युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यामुळं आतापर्यंत जवळपास 1 लाख 19 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केलं आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं, खूप ताकदवान मुलगी आहे, एकसाथ दोघांची धुलाई केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT