Uddhav Thackeray PM modi
Uddhav Thackeray PM modiSaam TV

Uddhav Thackeray Speech : महाराष्ट्राला मुर्ख समजलात का? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा

जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रांकडे दिले आहे.
Published on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या जातात. राज्यात दोन लाख कोटींचे प्रकल्प दिल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्राला तुम्ही काय उल्लू समजले आहे का? जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच हे सरकार त्या राज्याचा विचार करतं. निवडणुका लक्षात ठेवून कामं केली जातात. आजपर्यंत पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राची आठवण नाही आली. पण अचानक पंतप्रधानांना महाराष्ट्राबद्दल प्रेम आले आहे. 2 लाख कोटींचे प्रकल्प म्हणजे, जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रांकडे दिले आहे. हा फुगा फुटण्याआधी निवडणुका होतील असा आमचा अंदाज आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray PM modi
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निवडणुकीपूर्वीच नवा नारा; म्हणाले, 'मी घडवला हा गुजरात'

जे उद्योग येणार होते ते पळवून नेले, आणि जे नाहीत त्यांची घोषणा केली. मात्र यावरुन स्पष्ट होत आहे की निवडणुका जवळ आहेत. म्हणून मी काल कार्यकर्त्यांना सांगितलं की मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा. मी काही ज्योतिष नाही. मात्र निवडणुका आल्या की घोषणा सुरु होतात. त्यामुळे राज्यातही मध्यावधीसाठी तयार राहण्याच्या मी सूचना दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray PM modi
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

माजी राज्यमंत्री व माजी खासदार रमेश दुबे यांच्या आत्मचरित्र 'मेरी अमृत यात्रा' या पुस्तकाचे प्रकाशन आज वांद्रे पूर्व येथील उत्तर भारतीय संघाच्या सभागृहात पार पडलं. तिथे उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com