Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

Lok Sabha Election 2024 : मागील काळात स्वामी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली होती. मात्र शिंदेंकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे शांतिगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलीय.
Maharashtra Politics  2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

शिंदे गटाचे नेते अजय बोरस्तेंनी स्वामी शांतिगिरी महाराजांची भेट घेतलीये. बोरस्ते-शांतीगिरी महाराजांच्या भेटीने चर्चांना उधाण आलंय. मागील काळात स्वामी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली होती. मात्र शिंदेंकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे शांतिगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. दरम्यान नाशिकच्या रिंगणात अजूनही दोन महंत उतरणार आहेत, पाहुयात हा रिपोर्ट..

नाशिकच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच सुरु असतानाच साधु महंतांच्या एन्ट्रीमुळे रंगत वाढलीय. शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या शांतीगिरी महाराजांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मुख्यमंत्री शिंदेंनी दाद न दिल्यामुळे शांतिगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. दरम्यान शिंदे गटाचे नेते अजय बोरस्ते यांनी शांतिगिरी महाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय.दुसरीकडे महंत अनिकेत शास्त्रीदेखील लोकसभेच्या रिंगणात आहेत.. अनिकेत शास्त्रींनी थेट भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलंय.. मात्र अनिकेत शास्त्रींचा दावा भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी फेटाळलाय.धार्मिक नगरी असलेल्या नाशिकचा खासदारही आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरेचा असावा यासाठी स्वामी, महंत आग्रही आहेत.

शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी

2004ला इलाहाबादमधील कुंभमेळ्यात महामंडलेश्वर पदवी मिळाली. 2009मध्ये संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत 1 लाख 42 हजार मतं मिळवून तिसऱ्या क्रमांकावर होते. शांतिगिरी महाराजांचं व्यसनमुक्ती, शेती आणि शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे.. राज्यातील 13 ते 14 जिल्ह्यात जय बाबाजी भक्त परिवार सक्रीय आहे.

Maharashtra Politics  2024
Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

तर अनिकेत शास्त्री अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. तसंच महर्षी पंचायतन सिद्धपीठमचे पीठाधीश्वर आहेत. गौशाला, संतनिवास, यज्ञशाला, वेदविद्यालय, गरीब रुग्णांसाठी आयुर्वेद दवाखाना अशा सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे.. देश-विदेशात वेदांत आणि धर्मशास्त्रीय मार्गदर्शन, मानवता मूल्यांचं प्रचार कार्य अनिकेत शास्त्री करतात.

महंत सिद्धेशरानंद सरस्वती यांनीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केलीय. ते पंचायती आखाडा श्री निरंजनीचे महंत आहेत. सिदधेश्वारानंतर संन्यासी असून उच्चशिक्षित आहेत. कुपोषण मुक्तीसाठी वेळोवेळी आदिवासी पाड्यांवर जाऊन मदत करतात. गावा-गावात जाऊन ग्राम स्वच्छता अभियान करणं आणि स्वतः गोदावरी नदीमध्ये उतरून गोदावरी स्वच्छता अभियान राबवणं अशा कार्यात त्यांचा सहभाग असतो.

अयोध्येप्रमाणेच नाशकातही रामराज्य आणण्यासाठी साधु महंतांना खासदारकीचे वेध लागलेत. महायुतीचा तिढा सुटण्याआधीच साधू महंतांनी निवडणुकीची तयारी पूर्ण केलीय.. त्यामुळे आता साधुसंतांच्या मेळाव्यात राजकीय उमेदवारांना मतदारांचा आशीर्वाद मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल..

Maharashtra Politics  2024
Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com