Cm Eknath Shinde
Cm Eknath ShindeSaam Tv

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

Cm Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आले होते. यावेळी शहरातील मुक्त सैनिक वसाहतीमधील बापट कॅम्पमधील अनंतपुरम सोसायटीमध्ये राहणाऱ्या लहानग्याचे मन राखून मुख्यमंत्र्यांनी त्याचा वाढदिवस साजरा करत त्याचा हट्ट पूर्ण केला.

Kolhapur News:

>> रणजीत माजगावकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आले होते. यावेळी शहरातील मुक्त सैनिक वसाहतीमधील बापट कॅम्पमधील अनंतपुरम सोसायटीमध्ये राहणाऱ्या लहानग्याचे मन राखून मुख्यमंत्र्यांनी त्याचा वाढदिवस साजरा करत त्याचा हट्ट पूर्ण केला.

शहरातील पंतप्रधान मोदींची सभा यशस्वीपणे पार पडल्यानंतर मुख्यमंत्री काही कामानिमित्त शहरातील अनंतपुरम सोसायटीमध्ये आले होते. यावेळी या सोसायटीमध्येच राहणाऱ्या रिधान चावला या पाच वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. पण लहानग्या रिधानने काहीही करून मुख्यमंत्री महोदयांच्या सोबतच वाढदिवस साजरा करण्याचा हट्ट आपल्या पालकांकडे धरला.

Cm Eknath Shinde
Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

अखेरीस पालकांनी धीर करून मुख्यमंत्री या इमारतीमधून खाली उतरत असताना त्यांना रिधानसोबत वाढदिवस साजरा करण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्र्यांनी लहानग्या रिधानला आणि त्याच्या पालकांना केक घेऊन जवळ बोलावले आणि रिधानचा वाढदिवस साजरा केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पालक आणि मित्र मैत्रिणींच्या साथीने केक कापून रिधानचा वाढदिवस साजरा केला. तसेच हा केक त्याला भरवून वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या.

Cm Eknath Shinde
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्त्वाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार?

आपले सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांनी रिधानसोबत त्याचा वाढदिवस साजरा केल्याचे पाहून त्याचे पालक देखील भारावून गेले. लहानग्या रिधानचे मन राखून मुख्यमंत्र्यांनी आपली वेगळी ओळख नव्याने अधोरेखित केली. त्यांची ही कृती कोल्हापूरमध्येही चर्चेचा विषय ठरली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com