नवी दिल्ली : ट्विटर इंडियाने (Twitter India) कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते लॉक (Twitter Account Temporary Lock) केले आहे. सोबतच रणदीप सुरजेवाला बाळासाहेब थोरात यांसह कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. या प्रकारावर राहुल गांधी संतापले असून त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त करत ट्विटरवर टीकाही केली आहे. तसेच ट्विटर देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Twitter has interfered in politics by locking my account - Rahul Gandhi)
हे देखील पहा -
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधींनी यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करत आपली भुमिका मांडली आहे. एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला आहे. हा राहुल गांधींवर हल्ला नाही. हा फक्त माझा आवाज बंद करण्यापुरते नाही तर लाखो आणि करोडो लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी त्यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, “ट्विटर खाते बंद करून एका कंपनीने राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. व्यवसाय करणारी कंपनी राजकारण करत आहे.” एक राजकारणी म्हणून मला अशा गोष्टी आवडत नाहीत. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला आहे. माझे जवळपास १९ ते २० दशलक्ष फॉलोअर्स होते आणि तुम्ही त्यांना सर्वांना त्यांचे मत व्यक्त करण्यापासून रोखत आहात. ट्विटरने या कृतीने हे सिद्ध केले आहे की तो एक न्यूट्रल प्लॅटफॉर्म नाही. गुंतवणूकदारांसाठी ही एक धोकादायक गोष्ट आहे कारण राजकीय स्पर्धेत कोणाची बाजू घेतल्यास ट्विटरसाठी वाईट परिणाम होऊ शकतात.
हा आपल्या लोकशाहीवर हल्ला होत आहे. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. माध्यमांवर नियंत्रण आहे. मी समजत होतो की, ट्विटरच आशेचा एक किरण होता जिथे आपण ट्विटद्वारे आपला मुद्दा मांडू शकत होतो. पण ते तसे नाही. हे दर्शवते की ट्विटर हे तटस्थ व्यासपीठ नसून वस्तुनिष्ठ आहे, जे काही लोक त्यांच्या पद्धतीने वापरत आहेत.
राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट लॉक का केले?
दिल्ली येथील नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Delhi Rape Case) करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी बलात्कार पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. मात्र यावेळी बलात्कार पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेतल्याचे फोटो राहुल गांधींच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आले होते.
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ (Protection of Children from Sexual Offences Act 2012 -Pocso Act, पॉक्सो कायदा) यानुसार बलात्कार पिडीतेचे नाव, फोटो किंवा ओळख पटेल अशी कोणतीही महिती प्रसारित करणे अवैध आहे. याबाबत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं ट्विटर इंडियाला नोटीस पाठवत राहुल गांधींचे ते ट्विट हटवण्यास सांगितले होते. त्यानुसारच राहुल गांधींचे हे ट्विट डिलीट करण्यात करुन त्यांचं अकाउंटही लॉक करण्यात आलं आहे. मात्र आता राहुल गांधीच्या या आक्रमक वक्तव्यांमुळे ट्विटर आता काय भुमिका घेईल हे पहावं लागेल.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.