रानडे इन्स्टिट्यूट बिल्डरच्या हातात जाऊ देणार नाही - उदय सामंत

पुण्यातील काही बिल्डर्स गेल्या काही दिवसांपासून रानडे इन्स्टिट्यूटची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत.
रानडे इन्स्टिट्यूट बिल्डरच्या हातात जाऊ देणार नाही - उदय सामंत
रानडे इन्स्टिट्यूट बिल्डरच्या हातात जाऊ देणार नाही - उदय सामंतSaam tv news
Published On

बीड : रानडे इन्स्टिट्यूट (Ranade Institute) ही जगातली अशी संस्था आहे, की ज्या संस्थेविषयी सर्वांना आत्मीयता आहे. पत्रकारांनी (Journalist) याविषयी विरोध दर्शविला आहे. मात्र रानडे इन्स्टिट्यूट कोणी जर हलवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते होणार नाही. मी उद्याचं रानडे इन्स्टिट्यूटला भेट देतोय जो कोणी बिल्डरला देण्याचा निर्णय घेत असेल तर तो मंत्री म्हणून आम्ही हाणून पाडू. असा इशारा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी दिलाय. ते बीड जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते मीडियाशी बोलत होते.

रानडे इन्स्टिट्यूट बिल्डरच्या हातात जाऊ देणार नाही - उदय सामंत
नवीन आरोपांच्या विरोधात संजय राठोडांचा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील काही बिल्डर्स रानडे इन्स्टिट्यूटची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. रानडे इन्स्टिट्यूटमधील जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाला गेल्या अनेक दशकांची परंपरा आहे. विशेष म्हणजे या इतिहासकालीन इमारतीला हेरिटेज म्हणूनही जाहीर करण्याचीही मागणी सातत्याने होत असते. असे असतानाही रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता डिपाटर्मेटच पुणे विद्यापीठात हलवण्याचा आग्रह धरला जात आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवरील (FC road) रानडे इन्स्टिट्यूटची दिड एकर जागा आज बाजार भावानुसार 400 कोटी रुपयांची आहे. म्हणूनच रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता विभाग बिल्डरच्या घशात घालण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विद्यार्थी कृती समितीने केलाय.

हे देखील पहा-

त्याचबरोबर पुणे श्रमिक पत्रकार संघानेही या विलीनीकरणाला कडाडून विरोध केला आहे. रानडे इन्स्टिट्यूटमधील जनसंज्ञापण आणि वृत्तपत्र विभाग पुणे विद्यापीठाच्या मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज विभागात विलीनीकरणाला पुणे श्रमिक पत्रकार संघाचाही त्यास ठाम विरोध राहील, असा इशाराच पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर, इन्स्टिट्यूटमधून पत्रकारिता शिकलेले विद्यार्थी आज देशभरात पत्रकारिता करत आहेत. देशभरातील अनेक नामांकित संपादकही रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेत. यामुळे इन्स्टिट्यूटला एक वेगळच महत्तव आहे. मात्र तरीही काहीजण हे ऐतिहासितइन्स्टिट्यूट बिल्डरच्या घशात घालू पाहत आहेत. मात्र आम्ही ते कधीही होऊ देणार नसल्याचा इशाराच कृती समितीने विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिला.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com