Twitter Saam Tv
देश विदेश

Twitter Down: नेटीझन्स हैराण; सेवा खंडीत झाल्याने ट्विटरने मागितली माफी

वापरकर्ते लॉग इन करण्याचा प्रयत्न करत होते आणि लक्षात आले की काही तरी समस्या आहे.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ट्विटर वापरणारे आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजल्या पासून अस्वस्थ झाले हाेते. सुमारे एक तासभर वापरकर्त्यांना लाॅगीन हाेता आले नाही. त्यामुळे अनेक महत्वाच्या घडामाेडींना आम्ही मुकलाे अशा प्रकारची भावना नेटीझन्सनी twitter down हा हॅशटॅग वापरुन व्यक्त केली. दरम्यान तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने नेटीझन्सला त्रास सहन करावा लागला आता त्यामध्ये सुधारणा झाली आहे असे कंपनीने स्पष्ट केले. (twitter was down for users for some hours in the morning)

ट्विटरने (twitter) तांत्रिक बिघाडाचे निराकरण केल्याचे नमूद करीत वापरकर्त्यांचे ट्विट दिसू लागले आहेत. सर्व गाेष्टी नाॅर्मल झाल्या आहेत. संकेतस्थळ (website) काही तासांसाठी वापरकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम करत नव्हतं. आता काेणतीही अडचण नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. वापरकर्त्यांना आलेल्या व्यत्ययाबद्दल ट्विटरने एका निवेदनाच्या माध्यमातून क्षमा देखील मागितली आहे.

दरम्यान ट्विटर चालत नाही हे पहायल्यावर अनेकजण संतप्त झाले हाेते तर काही जण मीम्सच्या (memes) माध्यमातून ट्विटरवर शेरे मारताना दिसले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Maharashtra Tourism : हिवाळ्यात ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील 'हे' जुळे किल्ले बेस्ट, आताच ट्रिप प्लान करा

HBD Juhi Chawla : चित्रपटांपासून दूर असलेली जूही चावला आहे गडगंज श्रीमंत, संपत्ती आकडा वाचून धक्का बसेल

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! २ तासांचा प्रवास फक्त १० मिनिटात, ३९०० कोटींचा प्रोजेक्ट, वाचा सरकारचा मास्टर प्लॅन!

Shocking : पुणे हादरलं! लग्नाचे आमिष दाखवून २ तरुणींवर बलात्कार

SCROLL FOR NEXT