BJP Leader Caught in Car with Woman Saam Tv
देश विदेश

Shocking: स्मशानभूमीत नेलं, जबरदस्ती पँट काढली अन्...; भाजप नेत्याचा महिलेसोबतच्या आक्षेपार्ह VIDEO प्रकरणात मोठा ट्विस्ट

BJP Leader Caught in Car with Woman: उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये भाजप नेत्याला महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीमध्ये कारमध्ये गावकऱ्यांनी पकडल्याची घटना घडली होती. आता या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे. ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये भाजप नेत्याला एका विवाहित महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत गावकऱ्यांनी पकडले होते. स्मशाभूमीत कारमध्ये हे दोघे जण रासलीला करत होते याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. कारमध्ये भाजप नेत्यासह आक्षेपार्ह अवस्थेत पकडलेल्या महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. भाजप नेता आणि या महिलेला रंगेहाथ पकडणाऱ्या गावप्रमुखासह ६ जणांवर गैरवर्तन, मारहाण आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत केलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, 'आरोपींनी तिला जबरदस्तीने स्मशानभूमीत नेले. भाजप नेते राहुलची पॅन्ट जबरदस्तीने काढण्यात आली. आम्ही विरोध केला तेव्हा सर्वांनी आम्हाला मारहाण केली. नंतर त्यांनी आमचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांनी १.५ लाख रुपये उकळले. आता ते आणखी ३ लाख रुपये मागत होते. आम्ही पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी व्हिडिओ व्हायरल केले.'

शनिवारी भाजपचे नेत राहुल वाल्मिकी आणि एका महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात दिसत होते काही गावकऱ्यांनी भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडले होते. गर्दी पाहून भाजप नेता गाडीतून अंतर्वस्त्रांमध्ये बाहेर आला. मोबाईल कॅमेरा चालू पाहून तो लोकांचे पाय धरून माफी मागू लागला. त्याच्यासोबत उपस्थित असलेली विवाहित महिला ओढणीने चेहरा लपवत होती. भाजप नेता त्यावेळी गावकरी व्हिडीओ काढत असल्याचे पाहून अर्धनग्न अवस्थेतच पळून जात होता.

ही घटना बुलंदशहराच्या शिकारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कैलावन गावात असलेल्या स्मशानभूमीत घडली. हा व्हिडिओ डिसेंबर २०२४ चा असल्याचे सांगितले जात आहे. आरोपींना महिला आणि भाजप नेत्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ११ जुलै २०२५ रोजी त्यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. व्हिडिओ समोर आल्यानंतर महिलेने सलेमपूर पोलिस ठाण्यात गावप्रमुख उमेश, छोटेलाल शर्मा आणि शिकारपूर गावातील ललित यांच्यासह ६ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

Mahadevi Elephant:'महादेवी'साठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय; हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

SCROLL FOR NEXT