प्रविण गायकवाड हल्ल्याशी भाजपचं थेट कनेक्शन; भाजप मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, 'त्या' फोटोवर स्पष्टच बोलले | Pravin Gaikwad

Ink Attack on Pravin Gaikwad: अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. विरोधक आक्रमक, भाजपवर आरोप; बावनकुळे यांनी सर्व आरोप फेटाळले, तपासाची मागणी.
Ink Attack on Pravin Gaikwad
Ink Attack on Pravin GaikwadSaam Tv News
Published On

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या अंगावर शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई ओतली आणि हल्ला केला. ही घटना रविवारी अक्कलकोट येथे घडली. या हल्ल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला. प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे दीपक काटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. यावर मंत्री बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीशी काहीही संबंध नाही. अशा खालच्या लेव्हलचं कृत्य करणं भाजपच्या रक्तात नाही', असं बावनकुळे म्हणालेत. तसेच या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही केली. 'प्रवीण गायकवाड यांच्यासोबत जे घडलं, याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. आमचा संबंध नाही, भाजपचा कार्यकर्ता आहे पण कारवाई झाली पाहिजे', असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं.

Ink Attack on Pravin Gaikwad
Pune Crime: देवाच्या आळंदीत लाजिरवाणं कृत्य, तरूणीचे अपहरण करून अब्रुचे लचके तोडले, किर्तनकार महिलेनं रचला कट

यावेळी बावनकुळेंनी सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं, 'सुषमा अंधारे यांना माहित असायला हवे की कार्यकर्ते सगळे मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढतात, पोलिसांनी योग्य कारवाई करायला पाहिजे', असं म्हणत बावनकुळेंनी सर्व आरोप फेटाळून लावले.

प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधक आक्रमक झालेत. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. 'घडलेली घटना अतिशय लाजीरवाणी आहे. पोलिसांकडे त्यावेळेस पिस्तूल होती. पुणे विमानतळावर पिस्तूल सापडले होते. गुन्हेगार मोकाट फिरत आहे. या प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाली नाही तर आम्ही दिल्ली दरबारी जाणार, तिथे प्रश्न मांडणार. प्रविण गायकवाड यांना सुरक्षा दिली पाहिजे'.

Ink Attack on Pravin Gaikwad
स्मशानभूमीत कारमध्ये भाजप नेत्याची रासलीला; विवाहित महिलेसोबत संबंध ठेवताना गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं | Shocking

खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. 'प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला. हल्ला करणारा व्यक्ती भाजपने पोसलेले डावे होते. आता या लोकांवर जन सुरक्षा कायदा लावणार का? राज्यात कुठेही कुणालाही मारत आहे. सामाजिक आणि राजकीया कार्यकर्त्याला बाहेर पडताना भीती वाटत आहे. राज्यात भाजपची गुंड टोळी कधी कुणावरही हल्ला करतील सांगता येत नाही. फडणवीस सरकारमध्ये महाराष्ट्राचा गुंड राष्ट्र करून टाकला आहे', असं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com