Child Artist Death News Saam tv
देश विदेश

Child Artist Death : प्रसिद्ध बालकलाकारासह मोठ्या भावाचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

Child Artist Death News : प्रसिद्ध बालकलाकार वीर शर्माचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत बालकलाकार आणि त्याचा भावाचा देखील मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

'श्रीमद् रामायण'मधील बालकलाकार वीर शर्मा आणि त्याचा भावाचा मृत्यू

आगीच्या धुरामुळे दोन्ही भावांचा श्वास गुदमरून मृत्यू

दोन्ही भावांचे वडील कोचिंग शिक्षक आणि आई अभिनेत्री

मृत्यूनंतर कुटुंबीयांकडून दोघांचे डोळे दान करण्यात आले

टीव्ही शो 'श्रीमद् रामायण'मधील बालकलाकार वीर शर्मा आणि त्याचा भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाल कलाकाराच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ८ वर्षांचा वीर आणि १६ वर्षांचा त्याचा भाऊ राजस्थानमधील कोटा येथील घराला लागलेल्या आगीच्या धुरामुळे गुमदमरून मृत्यू झाला.

वीरचे वडील जितेंद्र शर्मा हे एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. ते दुर्घटनेच्या वेळी भजनाच्या कार्यक्रमाला गेलो होते. तर आई अभिनेत्री असल्याने कामानिमित्त मुंबईत होती. रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दुर्घटना घडली. त्यावेळी दोघे मुले घरात होते.

आग लागल्याचं कळताच शेजारी लोक घरात घुसले. शेजाऱ्यांनी अग्निशमन उपकरणांच्या सहाय्याने आग विझविली. मात्र, घराला लागलेल्या आगीच्या धुरामुळे दोघे भाऊ बेशुद्ध पडले होते.

शेजाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती मुलांच्या वडिलांनी दिली. शेजाऱ्यांनी दोघांना तातडीने रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. मुलांची आई मुंबईहून परतल्यानंतर कुटुंबीयांना मृतदेह सोपवण्यात आले. कुटुंबीयांच्या इच्छेनुसार मुलांचे डोळे दान करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.

बालकलाकार वीर शर्मा याने पौराणिक मालिका 'श्रीमद् रामायण'मध्ये पुष्कल आणि 'वीर हनुमान'मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारली होती. दोन्ही भावाच्या मृत्यूने शर्मा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - भांडुप रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची बत्ती गुल

Rutuja Bagwe: मुंबईत नाही तर या ठिकाणी घेतलं ऋतुजाने शिक्षण

Varicha Dosa Recipe : नवरात्रीत उपवासाला बनवा वरीचा डोसा, १० मिनिटांत रेसिपी तयार

Shahad Bridge: महत्वाची बातमी! शहाड पूल १५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गाचा करा वापर

Marathi Movie: 'लास्ट स्टॉप खांदा...' चित्रपटाचं कलरफुल पोस्टर लाँच; श्रमेश बेटकरसोबत दिसणार ही अभिनेत्री

SCROLL FOR NEXT