मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर आता माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. इराणी लेबर न्यूज एजन्सीने रविवारी (१ मार्च २०२६) दावा केला की महमूद अहमदीनेजाद इस्रायली-अमेरिकन हवाई हल्ल्यात मारले गेले. त्यांनी २००५ ते २०१३ पर्यंत इराणचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.
अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, ईशान्य तेहरानमधील नर्मक येथील अहमदीनेजाद यांच्या निवासस्थानावर हा हल्ला झाला होता, ज्यामध्ये ते आणि त्यांच्या अनेक अंगरक्षकांचा मृत्यू झाला होता. अध्यक्ष होण्यापूर्वी अहमदीनेजाद यांनी अर्दाबिल प्रांताचे गव्हर्नर आणि तेहरानचे महापौर म्हणून काम पाहिले. ते त्यांच्या पाश्चिमात्य विरोधी भूमिकेसाठी ओळखले जात होते. अहमदीनेजाद यांनी वारंवार इस्रायलचे अस्तित्व नाकारणारी आणि जगाच्या नकाशावरून ते पुसून टाकण्याची शपथ घेतली होती.
अयातुल्ला अली खमेनी यांच्या निधनानंतर, रविवारी काश्मीरपासून कर्नाटकपर्यंत भारतातील विविध भागात शिया समुदायाचे सदस्य रस्त्यावर उतरले आणि या घटनेबद्दल आपला संताप आणि शोक व्यक्त केला. नवी दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश आणि तेलंगणामध्येही शोक आणि घोषणाबाजीचे दृश्ये पाहायला मिळाली, खामेनींचे पोस्टर हातात घेऊन निदर्शकांनी अमेरिका आणि इस्रायली लष्करी कारवाईविरुद्ध आपला राग व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.