Turkey Ski Resort Fire  X (Twitter)
देश विदेश

Turkey Ski Resort Fire : रिसॉर्टमध्ये अग्नितांडव! ६६ जणांचा होरपळून मृत्यू, ५१ जखमी

Turkey Ski Resort Fire Video : हिवाळ्यातील शालेय सुट्ट्या असल्याने रिसॉर्टमध्ये पर्यटक जमले होते. माहितीनुसार, पहाटे तीनच्या सुमारास रिसॉर्टमध्ये आग लागली. त्यावेळेस तेथे तब्बल २३४ पर्यटक थांबले होते.

Yash Shirke

Turkey Ski Resort Fire : तुर्कस्तानच्या एका स्की रिसॉर्टमधील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत किमात ६६ लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर ५० पेक्षा जास्त नागरिक यात जखमी झाले आहे. स्थानिक वेळेनुसार ३ च्या सुमारास ही आग लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आगीची दाहकता पाहायला मिळते.

तुर्कस्तानचे मंत्री अली येर्लिकाया यांनी या अपघाताची माहिती दिली. ते म्हणाले, 'तुर्कस्तानच्या बोलू प्रांतातील कार्तलकाया रिसॉर्टमधील एका इमारतीमध्ये पहाटे ३.२७ वाजता आग लागली. आगीत दुर्देवाने ६६ जणांचा जीव गेला. तर ५१ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील पीडितांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. आगीच्या ज्वालांनी वेढलेले लोक इमारतीतून बाहेर पडण्यासाठी खिडक्यांमधून उडी मारण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नांमध्ये दोघांचा मृत्यू झाला.'

या भयावह अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये इमारतीच्या भोवती आगीमुळे झालेला धूर देखील दिसतो. यावरुन ही आग किती भयंकर होती हे लक्षात येते. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच २८ रुग्णवाहिकांनाही तेथे पाठवण्यात आले.

बोलू प्रांताचे गव्हर्नर अब्दुलअजीझ आयदिन यांनी 'घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये तब्बल २३४ पाहुणे थांबले होते. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक फिरण्यासाठी रिसॉर्टमध्ये आले होते. त्याच दरम्यान हा मोठा अपघात झाला', अशी माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT