Earthquake Saam TV
देश विदेश

Turkey Earthquake Update: निसर्गाचा कोप! तुर्कस्तान भूकंपातील मृतांचा आकडा 750च्या वर, दहा शहरं उद्ध्वस्त

तुर्की आणि सीरियामध्ये आतापर्यंत एकूण 757 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Turkey Earthquake Update: तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपाचे हादरे शेजारील देशातही बसले आहेत. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी दोन शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले. भूंकपानंतर तुर्कीमधील अवस्थापासून जगभरातून दु:ख व्यक्त केलं जात आहेत.

भूकंपातील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. तुर्की आणि सीरियामध्ये आतापर्यंत एकूण 757 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यात सीरियातील 237 आणि तुर्कीमधील 520 लोकांचा समावेश आहे.

तर 3 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्कीतील अडाना शहरात 17 मजली आणि 14 मजली इमारती कोसळल्या आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरु आहे.

स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.17 वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला आणि काही मिनिटांनंतर मध्य तुर्कस्तानमध्ये दुसरा हादरा जाणवला. तुर्कस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिअॅक्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. हा भूकंप दक्षिण तुर्कीमध्ये झाला. भूकंपानंतर तुर्कीने आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहन केले आहे.

10 शहरांमध्ये प्रचंड नुकसान

बीएनओ न्यूजनुसार, सीरियामध्येही मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत येथे 237 लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. तुर्कस्तान सरकारने सांगितलं की, भूकंपाचा देशातील 10 शहरांवर मोठा परिणाम झाला आहे.

शक्तिशाली भूकंपानंतर तुर्कस्तानमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. अनेक इमारती कोसळल्याने ढिगाऱ्यात अनेक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress No Makeup Look: ही क्यूट अभिनेत्री कधीच करत नाही मेकअप, लवकरच करणार 'रामायण'मध्ये काम

Mhada Konkan : म्हाडाच्या ७१ अनिवासी गाळ्यांचा ई लिलाव; नोंदणी अर्ज, बोली आणि निकाल कधी? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजित पवार यांचे मंत्रीपद आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करणार : काळुराम चौधरी

KDMC : २७ गाव वगळून प्रभाग रचना करावी; केडीएमसीकडे काँग्रेस, उबाठा, मनसेची मागणी

Akola Riots : अकोला दंगल प्रकरणात सुप्रीम कोर्टचा पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT