Sharad Pawar: शरद पवारांनाही इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाची भुरळ, पण व्यक्त केली एक खंत...

पुण्यात कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्तच्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनांचं आयोजन करण्यात आलं होतं.
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV
Published On

पुणे : कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. सोशल मीडियासह अवघा महाराष्ट्र इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने परिचित आहे. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आवडणाऱ्यांची संख्या मोठी आहेत. अनेक दिग्गज देखील या लिस्ट आहेत. मात्र मला इंदुरीकर महाराजांचा कीर्तन आवडतं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पुण्यात कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्तच्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनांचं आयोजन करण्यात आलं होतं. येथे शरद पवार उपस्थित होते, मात्र पुढील नियोजित कार्यक्रमाला त्यांना जायचं होतं. म्हणून शरद पवारांना कीर्तनाला थांबता आलं नाही, याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली. (Pune News)

Sharad Pawar
Turkey Earthquake Update : तुर्कस्तान भूकंपाच्या 7.8 रिश्टर स्केलच्या धक्क्याने हादरला, 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

संसदेच्या अधिवेशनासाठी जायचं असल्यानं यावेळी कीर्तन ऐकता येणार नाही. ही खंत आहे परंतु पुढच्या वेळी नक्कीच कीर्तनाचा लाभ घेऊ. मी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन बघत असतो. मला आजही त्यांचं कीर्तन ऐकायची इच्छा होती. त्यांच्या कीर्तनामध्ये गमती असतात. त्यांची काय ॲक्शन चांगली असते. सामान्य माणसावर कीर्तनातून चांगले संस्कार ते करत असतात, असं शरद पवार यांनी म्हटलं.

Sharad Pawar
Pune Bypoll: कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला! 'साम टीव्ही'च्या बातमीवर शिक्कामोर्तब

इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे तरुणांपासून वृद्धापर्यंत अनेकजण फॅन आहेत. विनोदी शैलीत सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करण्याची त्यांची पद्धत अनेकांना आवडते.मात्र त्यांच्या कीर्तनामुळे ते अनेकदा अडचणीत सापडले आहेत. मात्र तरीही त्यांचं कीतर्नावर प्रेम करणाऱ्यांची यादी मोठी आहे. या यादीत शरद पवारांचाही समावेश आहे, याची कबुली खुद्द त्यांनीच दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com