Turkey Earthquake News Saam TV
देश विदेश

Turkey Earthquake : तुर्कीमधील भूकंपात भारतीय नागरिकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली सापडला मृतदेह, टॅटूवरून पटली ओळख

भूकंपात बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकाचा मृतदेह आढळून आला आहे.

Satish Daud

Turkey Earthquake News : तुर्की आणि सिरीयामध्ये ६ फेब्रुवारीला सकाळी विनाशकारी भूकंप झाला. आतापर्यंत या भूकंपात २४ हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर २० हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. अजूनही हजारो लोक बेपत्ता आहे. जगभरातील देशांनी याठिकाणी आपापले सैन्य पाठवून बचावकार्याला सुरुवात केली आहे. अशातच, भूकंपात बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकाचा मृतदेह आढळून आला आहे. (Latest Marathi News)

विजय कुमार गौंड (वय ३६ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकाचे नाव आहे. विजयकुमार हे उत्तराखंडमधील कोटद्वाराचे रहिवासी असल्याची माहिती आहे. ते बेंगळुरूमधील ऑक्सी प्लांट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करत होते. जेव्हा सोमवारी भूकंप झाला तेव्हा ते तुर्कीला व्यावसायिक सहलीवर होते.

दरम्यान, भूकंपानंतर विजयकुमारहे बेपत्ता झाले होते. त्यानंतर आज त्यांचा मृतदेह तुर्कस्तानच्या मलत्या भागातील एका फोर स्टार हॉटेलच्या ढिगाऱ्यात सापडला होता. हा मृतदेह भारतीय नागरिकाचा असल्याचं तुर्की प्रशासनाच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती भारतीय दुतावासांना दिली. दुतावासांनी विजयकुमार यांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी टॅटूच्या आधारे त्याची ओळख पटवली आहे.

याबाबत तुर्कीमधील भारतीय दूतावासांनी ट्विट करत एक निवेदन जारी केलं आहे. "आम्ही दुःखाने कळवत आहोत की ६ फेब्रुवारीच्या भूकंपानंतर बेपत्ता असलेले भारतीय नागरिक विजय कुमार यांचे पार्थिव सापडले आहे. मालत्या येथील एका हॉटेलच्या ढिगाऱ्यांमध्ये त्याची ओळख पटली असून ते व्यावसायिक ट्रिपसाठी तुर्की येथे आले होते. विजयकुमार यांचा मृतदेह लवकरात लवकर त्याच्या कुटुंबीयांकडे आणण्याची व्यवस्था केली जात आहे, असे दूतावासांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, तुर्कीत आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर मृतांचा आकडा २४ हजारांच्या पुढे गेला आहे. तो आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते भूकंपामुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते. सध्या हजारो लोक भूकंपग्रस्त भागात रुग्णालयात दाखल आहेत. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अजूनही काही लोक जिवंत सापडत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT