Uttarakhand News : नियतीचा क्रूर खेळ, लग्नाचे फेरे घेताना नवरदेवाला हार्ट अटॅक; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

लग्नाचे फेरे घेत असताना एका ३० वर्षीय डॉक्टरचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Groom died of heart attack
Groom died of heart attack Saam TV
Published On

Uttarakhand News : लग्नाचे फेरे घेत असताना एका ३० वर्षीय डॉक्टरचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तराखंडच्या (Uttarakhand) अल्मोडा जिल्ह्यातील रानीखेत गावात ही घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेनं लग्नघरावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांना मोठा हादरला बसला आहे.

डॉ. समीर उपाध्याय (वय ३० वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. समीर हे मॅट्रिक्स हॉस्पिटल, हल्दवणी येथे दंतवैद्य होते. शुक्रवारी त्यांचा विवाह राणीखेत येथील एका तरुणीसोबत होणार होता. सायंकाळचे लग्न असल्याने हल्दवानी येथून समीर यांची वरात निघाली होती. (Latest Marathi News)

Groom died of heart attack
Mumbai Crime : हायवेवरील हॉटेलमध्ये जेवण करायला गेले अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकले; नेमकं काय आहे प्रकरण?

दरम्यान, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समीर हे हल्दवानी येथील लग्नमंडपात पोहचले. लग्नाचे ७ फेरे घेण्यापूर्वी समीर उपाध्याय यांची प्रकृती ठीक होती. मात्र, अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. आणि लग्नाचे फेरे घेत असतानाच ते खाली कोसळले.

समीर अचानक खाली कोसळ्याने लग्नमंडपात मोठा गोंधळ निर्माण झाला. समीर यांच्या कुटुंबीयांसह वऱ्हाडी मंडळींनी त्यांच्याकडे धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या समीर यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Groom died of heart attack
Viral News : विवाहित महिलेला प्रपोज करायला गेला अन् फजिती करून बसला; तरुणाला घडली चांगलीच अद्दल, पाहा VIDEO

मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉ.समीर यांच्या निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे. डॉ. समीरला दोन बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे; तर धाकटी बहीण डॉक्टर आहे. त्याचे वडील काही काळापूर्वी ओमानहून परतले आहेत. मात्र, त्यांची प्रकृतीही खराब आहे. मुलाच्या मृत्यूने आई-वडिलांचा दोघांचा आधार हिरावला गेला आहे.

राणीखेत येथून वधूसह परतणाऱ्या डॉक्टरचा मृतदेह शनिवारी सकाळी घरी आणण्यात आला. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीय रडून हळहळले आहेत. मॅट्रिक्स हॉस्पिटलचे संचालक आणि हल्द्वानी शहरातील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रदीप पांडे सांगतात की, याआधीही डॉ. समीर यांनी त्यांच्या तब्येतीची तक्रार केली नव्हती. या वयात हृदयविकाराचा झटका का आला हा संशोधनाचा विषय आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com