Trump President Oath Ceremony Inaugural Lunch mint
देश विदेश

Trump Inaugural Food Menu: लॉबस्टर रोल, गिल्ड चिकन, क्रीम पनीर; डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात तगडा पाहुणचार

Trump President Oath Ceremony Inaugural Lunch: 1897 मध्ये सिनेट समितीने अध्यक्ष विल्यम मॅककिन्ले यांच्यासाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते. तेव्हापासून स्नेहभोजनाची सुरुवात झालीय.

Bharat Jadhav

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून आज शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर कॅपिटल स्टॅच्युरी सभागृहात सोहळ्यासाठी हजेरी लावलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलीय. या इनॉगरल लंचासाठी अनेक लज्जतदार पदार्थ बनवण्यात आली आहेत. शपथविधी सोहळ्याच्या समारंभात कोण-कोणते पदार्थ बनवण्यात आली आहेत. त्याची माहिती आपण घेऊ.

इनॉगरल लंचला १८९७ पासून सुरूवात झाली. यावेळी व्यवस्था विषयक सिनेट समितीने अध्यक्ष विल्यम मॅककिन्ले यांच्यासाठी डिनरचे आयोजन केले होते. तेव्हापासून उदघाटन स्नेहभोजनाला सुरुवात झाली. संयुक्त काँग्रेस कमिटी १९५३ पासून उद्घाटन सोहळ्यासाठी जेवणाचे नियोजन करत आहे. हे लंच देश, प्रदेश किंवा देशाच्या पुढील राष्ट्रपतींच्या वैयक्तिक निवडीचे खाद्यपदार्थांना प्रतिबिंबित करणारे असते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटन लंचमध्ये काय आहेत मेनू

अमेरिकेतील लोकशाही परंपरांना आदरांजली म्हणून उद्घाटन स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात येते. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्नेहभोजनाच्या लंचच्या मेनूमध्ये ३ कोर्सचा समावेश करण्यात आलाय. यात एक सीफूड डिश, एक मीट डिश आणि आइस्क्रीमचा सामवेश मेनू ठेवण्यात आलाय.

गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही लॉबस्टर रोल, ग्रील्ड चिकन, क्रीम चीज आणि काजू, ग्रॅव्हिल सूप, बार्बेक्यू सेव्हन हिल्स अँगस बीफ, चॉकलेट चिप कुकीज असे पदार्थ पाहुण्यांच्या ताटात असण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये शेवटच्या उद्घाटन लंचमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि इतर २०० पाहुण्यांनी थ्री-कोर्स लंचचा आस्वाद घेतला होता. मुख्य डिशमध्ये बार्बेक्यूड सेव्हन हिल्स एंगस बीफ, डार्क चॉकलेट, बटाटा ग्रेटिन आणि ज्यूससह मेन लॉबस्टर आणि गल्फ कोळंबीचे एपेटाइजर समाविष्ट होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT