Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी, मुकेश अंबानींसह कोण कोण उपस्थित राहणार? १० पॉईंट्समधून समजून घ्या

Donald Trump Inauguration Ceremony: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा शपथविधी सोहळा कुठे, कसा असणार आहेत आणि या सोहळ्याला कोण-कोण हजेरी लावणार वाचा सविस्तर...
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी, मुकेश अंबानींसह कोण कोण उपस्थित राहणार? १० पॉईंट्समधून समजून घ्या
Donald Trump Saam Tv
Published On

डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अमेरिकेमध्ये सध्या तापमान उणे ६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच यावेळी हा शपथविधी सोहळा इनडोअर होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेच्या संसदेत शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. शपथविधी सोहळ्याला भारतामधून उद्योगपती मुकेश अंबानींसह अनेक दिग्गज मंडळी जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

शपथविधी सोहळा कधी होणार?

अमेरिकन वेळेनुसार सकाळी १० वाजता शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्रीचे साडेआठ वाजता हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प दुपारी १२ वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील.

कुठे होणार शपथविधी सोहळा?

डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा यूएस कॅपिटलमध्ये होणार आहे. तब्बल ४० वर्षांनंतर हा शपथविधी सोहळा इनडोअर होणार आहे. कॅपिटल हिल्स येथील कॅपिटल रोटुंडा येथे हा सोहळा होणार आहे. याआधी १९८५ मध्ये अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी कडाक्याच्या थंडीमु दुसऱ्या कार्यकाळाची शपथ इनडोअर घेतली होती. जवळपास ४ दशकांनंतर अमेरिकेत पुन्हा असे घडणार आहे.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी, मुकेश अंबानींसह कोण कोण उपस्थित राहणार? १० पॉईंट्समधून समजून घ्या
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा; सर्व ३४ आरोपांमधून निर्दोष मुक्तता, काय आहे संपूर्ण प्रकरण?

कोण देणार शपथ -

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सरन्यायाधीश शपथ देतात. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स शपथ देणार आहेत.

फक्त ३५ शब्दांची शपथ -

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या शपथेमध्ये केवळ ३५ शब्द असतात. ही शपथ अमेरिकन राज्यघटनेचा एक भाग आहे आणि त्याला राज्यघटनेचा मूळ आत्मा म्हटले जाते.

बायबलमध्ये शपथ -

डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान दोन बायबल वापरतील. यापैकी एक बायबल त्यांना त्यांच्या आईने भेट म्हणून दिले होते. तर दुसरे लिंकन बायबल आहे.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी, मुकेश अंबानींसह कोण कोण उपस्थित राहणार? १० पॉईंट्समधून समजून घ्या
Donald Trump: निवडणूक जिंकताच ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट पुतिन यांना केला फोन, युक्रेन युद्धावर चर्चा

कोण-कोण सहभाग आहे?

राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन आणि जिल बाइडेन, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि हिलेरी क्लिंटन, माजी अध्यक्ष जॉर्ज बुश आणि लॉरा बुश हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत पण त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा येणार नाहीत. उपराष्ट्रपती कमला हॅरिस देखील सहभागी होणार नाहीत.

परदेशी पाहुणे लावणार हजेरी -

टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलोन मस्क, ॲमेझॉनचे जेफ बेझोस, मेटाचे मार्क झुकरबर्ग, ॲपलचे टिम कुक आणि ओपनएआयचे सॅम ऑल्टमन हे देखील या सोहळ्याला हजेरी लावतील. यासोबत अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे देखील येणार आहेत.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी, मुकेश अंबानींसह कोण कोण उपस्थित राहणार? १० पॉईंट्समधून समजून घ्या
Donald Trump आहेत 'बिग बी' अन् 'किंग खान'चे मोठे फॅन, आवडते चित्रपट सांगत केला खुलासा

भारतातून कोण कोण जाणार -

भारतामधून परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर, रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

शपथविधी सोहळ्याचा खर्च -

महत्वाचे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचा खर्च सरकारकडून किंवा नागरिकांच्या टॅक्समधून केला जाणार नाही. तर या सोहळ्यासाठी Apple चे सीईओ टिम कुक, मार्क झुकरबर्ग, ओपनएआयचे सीईओ सॅम अल्टमन यासारख्या उद्योगपतींनी निधी दिली आहे.

१०० पेक्षा जास्त फाइल्सवर करणार स्वाक्षरी -

राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प युद्धपातळीवर आपले काम सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या दिवशी १०० पेक्षा अधिक फाइल्सवर स्वाक्षरी करू शकतात असे सांगितले जात आहे.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी, मुकेश अंबानींसह कोण कोण उपस्थित राहणार? १० पॉईंट्समधून समजून घ्या
Donald Trump Shooting: मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; ४०० मीटर अंतरावरुन AK-47 रायफलने झाडल्या गोळ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com