Truck Carrying Cash Breaks Down Saam Tv
देश विदेश

Truck Carrying Cash Breaks Down: बाबो! 535 कोटींची रोकड घेऊन जाणारा ट्रक अचानक बंद पडला, आजूबाजूला गर्दी जमू लागली अन् मग...

चेन्नईच्या दिशेने जात असताना ५३५ कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक अचानक खराब झाला.

Shivani Tichkule

Truck Carrying Cash Breaks Down in Chennai: चेन्नईच्या दिशेने जात असताना ५३५ कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक अचानक खराब झाला. त्यानंतर तात्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, 535 कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारा ट्रक अचानक बंद पडला. (Latest Marathi News)

या प्रकरणाची माहिती मिळताच क्रोमपेट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी एक ट्रक (Truck) उभा असल्याचे पोलिसांना दिसले. यावेळी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत घटनास्थळी उपस्थित लोकांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. ट्रकच्या जवळपास पोलीस पोहोचल्यावर लोकांनीही आपापले अंदाज बांधायला सुरुवात केली आणि रस्त्यावर लोकांची गर्दी होऊ लागली.

तांबारामचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवासन हेही पोलीस (Police) पथकासह घटनास्थळी पोहोचले. चेन्नई (Chennai) येथून दोन ट्रक रोकड घेऊन जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दरम्यान, वाटेत एका ट्रकचे इंजिन बिघडले. हे समजताच आजूबाजूला लोकांची मोठी गर्दी झाली. रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. ट्रकमधून धूर निघू लागला, तपासणी केल्यानंतर इंजिन खराब झाल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

गर्दी जमू लागल्यावर पोलिसांनी तत्काळ केले हे काम

दोन्ही ट्रकच्या आजूबाजूला मोठा जमाव असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने दोन्ही ट्रक जवळच्या कॅम्पसमध्ये नेले. यादरम्यान ट्रकचे इंजिन दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिकला पाचारण करण्यात आले, मात्र ट्रक दुरुस्त होऊ शकला नाही. अखेर दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने दोन्ही ट्रक आरबीआयकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रुपाली ठोंबरेंनी माधवी खंडाळकर यांना पाठवली १० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस

Maharashtra Politics: नागपुरमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसला जोरदार धक्का; डझनभर नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Nashik Tourism : ट्रेकर्सनी आवर्जून भेट द्यावा असा नाशिकमधील ट्रेकिंग पॉइंट, हिवाळी ट्रिपसाठी परफेक्ट

Renuka Shahane : 'तेव्हा आईची खरी किंमत कळते...', रेणुका शहाणेंनी सांगितले आईचं महत्त्व, पाहा VIDEO

Shocking : पुणे हादरले! वीट आणि दांडक्याने मारहाण करत महिलेची हत्या, ३ दिवस घरातच ठेवला मृतदेह

SCROLL FOR NEXT