Jalgaon Accident News: लग्नमंडपात पसरली शोककळा; पित्याचा मृत्य, तरुण मुलगा जखमी

लग्नमंडपात पसरली शोककळा; पित्याचा मृत्य, तरुण मुलगा जखमी
Jalgaon Accident News
Jalgaon Accident NewsSaam tv

जळगाव : जळगावला नातेवाइकांच्या लग्नासाठी दुचाकीने येणाऱ्या बापलेकासह चौघांना ट्रॅक्टरने धडक दिली. ही घटना सावखेडा फाट्यावर घडली. या (Accident) अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर तीन जण जखमी झाले. ज्ञानेश्वर रामराव सपकाळे (वय ४१, रा. फुफनी, ता. जळगाव) असे (Jalgaon News) मृताचे नाव आहे, तर त्यांचा मोठा मुलगा डिगंबर सपकाळे (वय १९), त्यांचे मित्र राजेंद्र सोनवणे (४८), नीलेश निकम (४५) जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Live Marathi News)

Jalgaon Accident News
Kolhapur News : ए ए रां....,ग्रामसभेत दाेन गटात राडा, खूर्च्या फेकून मारल्याने ग्रामस्थ जखमी

जळगावातील रिंग रोडवरील मंगल कार्यालयात नातेवाइकाच्या (Marriage) लग्नासाठी ज्ञानेश्वर सपकाळे हे दुचाकीने फुफनी येथून येण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत दुचाकीवर मोठा मुलगा डिगंबर व दुसऱ्या दुचाकीवर राजेंद्र सोनवणे, नीलेश निकम निघाले होते. काही अंतरावर सावखेडा फाट्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकींना एकामागून एक जोरदार धडक दिली. या अपघातात चौघेही रस्त्याच्या खाली फेकले गेले. यात ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले, तर इतर तीन जण जखमी झाले. या अपघाताची माहिती समजताच सावखेडा, किनोद गावातील ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत शांताराम निकम यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक फौजदार अनिल फेगडे अधिक तपास करीत आहेत.

Jalgaon Accident News
Nandurbar Bribe Case: रेशनकार्डसाठी हजार रुपयांची लाच; संगणक चालकासह दोघांविरुध्द गुन्हा

मंडपात वाट पाहत असलेल्‍या पत्‍नीला आली मृत्‍यूची बातमी

विवाह असल्याने ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पत्नी वंदना सकाळीच लग्नाच्या ठिकाणी पोचल्या होत्या. पती ज्ञानेश्वर व मुलगा डिगंबर यांची त्या वाट पाहत असतानाच अपघाताची वाईट बातमी कानावर पडली. ऐन लग्नाच्या धामधुमीत धावपळ उडून नातेवाइकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. मृत ज्ञानेश्वर सपकाळे यांच्यामागे तीन मुले, पत्नी व आई, असा परिवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com