Punjab Train Fire Saam Tv
देश विदेश

Train Fire: धावत्या ट्रेनला भीषण आग, 4 डबे जळून खाक; प्रवाश्यांनी घाबरून खाली उड्या मारल्या

Punjab Train Fire: पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग लागली. या आगीमध्ये ४ डबे जळून खाक झाले. प्रवाश्यांनी घाबरून ट्रेनमधून खाली उड्या मारल्या.

Priya More
  • पंजाबमधील पटियालाजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग लागली

  • सराई बंजारा गावाजवळ ही घटना घडली

  • ट्रेनचे चार डबे आगीमध्ये जळून खाक झाले

  • आग लागल्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली आणि प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या

पंजाबमध्ये धावत्या ट्रेनला भीषण आग लागली. पंजाबच्या पटियालाजवळ ही घटना घडली. या आगीत कर्मभूमी एक्स्प्रेसचे ४ डबे जळून खाक झाले. आग लागल्यानंतर ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी प्रचंड घाबरले. जीव मुठीत धरून हे प्रवासी घाबरून सैरावैरा पळू लागले. काही प्रवासांनी धावत्या ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. आग लागताच ट्रेन थांबवण्यात आली त्यानंतर प्रवाशांनी खाली उड्या मारल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी पंजाबवरून बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग लागली. राजपुराच्या दिशेन ही ट्रेन जात होती. त्याचवेळी सराई बंजारा गावाजवळ ट्रेनला आग लागली. चार डब्यांना ही आग लागली. या आगीमध्ये कुणीही जखमी झाले नाही. ट्रेनला आग लागल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि रेल्वे कर्मचारी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर रेल्वेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासामध्ये सर्व संभाव्य बाबींची तपासणी केली जाणार आहे.

कर्मभूमी एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचे थरारक व्हिडीओ आणि फोटो0 समोर आले आहेत. आगीच्या ज्वाला आणि परिसरात धुराचे लोट पसरल्याचे यामध्ये पाहायला मिळत आहे. घटनास्थळी आसपासच्या गावातील नागरिकांनी गर्दी केली आहे. आग लागल्याचे कळताच प्रवासी घाबरले आणि त्यांनी ट्रेनच्या बाहेर उड्या मारल्या. ही आग ट्रेनच्या पँट्रीमध्ये लागली त्यानंतर ती इतर डब्यांमध्ये पसरली अशी माहिती आहे. फायर अलार्म वाजल्यानंतर सर्वजण सावध झाले आणि ट्रेनमधून बाहेर पडले. या आगीमध्ये कोणतिही जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महापालिकेची टिंगरे नगर रोडवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई

नोकरदारांसाठी मोठी अपडेट! EPFO मध्ये अतिरिक्त रक्कम भरण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या काय होऊ शकतो बदल

Hair Loss In Men: केस झपाट्याने गळतायत? वेळीच करा या टेस्ट, शरीरातील गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण!

Back Pain : कॅन्सरपेक्षा कंबरदुखी खतरनाक, नेहमीच्या 'या' ५ सवयी ठरतायत धोकादायक

बांगलादेश ताब्यात घेणार! डेडलाईनही ठरली; भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT