Air India Plane Crash x
देश विदेश

Air India Plane Crash: 'मेडे, मेडे, मेडे...विमान उडत नाही, वाचणार नाही', पायलट सुमित सभरवाल यांचा शेवटचा मेसेज अन्...

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवाल यांनी एटीसीला शेवटचा मेसेज दिला होता. हा मेसेज काय होता याची माहिती समोर आली आहे. हा मेसेज दिल्यानंतर लगेचच विमान कोसळलं.

Priya More

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या विमानाचे पायलट सुमित सभरवालने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला (ATC) पाठवलेला शेवटचा मेसेज समोर आला आहे. या ५ सेकंदांच्या मेसेजमध्ये सुमित यांनी एटीसीशी संपर्क साधला उड्डानानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. 'मेडे, मेडे, मेडे...जोर मिळत नाहीये. पावर कमी होत चाललीये आहे. विमान उडत नाहीये. आम्ही वाचणार नाही.'

पायलट सुमित सभरवाल यांनी एटीसीला शेवटचा मेसेज दिल्यानंतर अवघ्या काही सेकंदात विमान अहमदाबादमधील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. अहमदाबादमध्ये झालेल्या या भयंकर विमान अपघातामधील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत २७५ जणांचा मृत्यू झाला. विमानामधील २४१ जण आणि मेडिकल कॉलेजमधील ३४ जणांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

अहमदाबाद विमान अपघातामागे तांत्रिक बिघाड हे प्राथमिक कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी सांगितले की, विमानाच्या व्हिडिओवरून असे दिसून येते की टेक-ऑफ दरम्यान विमानाला जोर मिळत नव्हता. ज्यामुळे विमान उड्डाण करू शकले नाही. अहमदाबाद विमान अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला त्यांच्या बोईंग विमानांची अतिरिक्त तपासणी आणि देखभाल करण्याचे निर्देश दिले आहेत.

अहमदाबाद विमान अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला आहे. विमानतळ प्राधिकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, एक डीव्हीआर देखील सापडला आहे. आता लवकरच या विमान अपघाताचे खरं कारण समजू शकेल. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे नातेवाईक अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले आहेत. कुटुंबातील सदस्यांची डीएनए ओळखण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. डीएनए नमुन्यांच्या आधारे मृतदेह मृतांच्या नातेवाईकांना सोपवले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parth Pawar: कुणी चुकीचे काम करत असेल तर...; पार्थ पवारांवरील घोटाळ्याच्या आरोपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Janhvi Kapoor: वेडिंग सीझनसाठी परफेक्ट आहे जान्हवीचा 'हा' लूक तुम्हीही करु शकता रिक्रिएट

१८० किमी वेगाने धावणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन; लोको पायलटच्या केबिनमधून सुवर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Rupali Bhosle Serial: अभिनेत्री रूपाली भोसलेची पहिली मराठी मालिका कोणती होती?

Lasun Shev Recipe: नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत अन् झणझणीत लसूण शेव, सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT