Uttar Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: वडिलांच्या अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, भरधाव कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशमध्ये पानीपत-खटीमा राष्ट्रीय महामार्गावर भयंकर अपघात झाला. भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Priya More

Summary -

  • मुझफ्फरनगरमध्ये कार-ट्रकचा भीषण अपघात झाला.

  • भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

  • वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी जाताना कुटुंबावर काळाने घाला घातला.

  • अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाले.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पानीपत-खटीमा राष्ट्रीय महामार्गावर तितावी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी हरिद्वारला जात असताना ही भयंकर घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, करनाल जिल्ह्यातील फरीदपूर गावातील रहिवासी मोहिंदर यांचे १० दिवसांपूर्वी कर्करोगाने निधन झाले होते. त्यांचे कुटुंब त्यांच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी हरिद्वारला जात होते. कुटुंबातील सर्वजण कारने हरिद्वारला निघाले. त्याचवेळी पानीपत-खतिमा राष्ट्रीय महामार्गावरील त्रिदेव हॉटेलजवळ त्यांच्या भरधाव कारने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की कार ट्रकच्या खाली घुसून तिच चक्काचूर झाला. कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले. उपचारादरम्यान एका जखमीचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. मृतांमध्ये कार चालक विनोदचा मुलगा शिवा, राजेंद्रची पत्नी मिनी, मोहिंदरची पत्नी मोहिनी, मोहिंदरचा मुलगा पियुष, जगन्नाथचा मुलगा राजेंद्र आणि सुनीलची पत्नी अंजू यांचा समावेश आहे. मोहिंदरचा मुलगा हार्दिक गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी ट्रकला ताब्यात घेतलं आहे. पोलिस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. अपघाताचे खरे कारण शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण करनालमधील फरीदपूर येथील रहिवासी होते. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेतली आणि जखमीवर चांगले उपचार करण्यात यावेत असे आदेश दिले आहेत. एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड|VIDEO

Maharashtra Live News Update: बी टी कवडे रस्त्यावर पुन्हा कोयत्याने गाड्या फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

Maharashtra Politics: तेव्हा मूग गिळून का बसले होते? खासदार नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Pune : पुण्यात बिबट्याचा धुमाकूळ; १३ वर्षीय मुलाचा जीवघेणा हल्ल्यात मृत्यू, ग्रामस्थांनी वनविभागाचं कार्यालय पेटवलं

India W vs South Africa W Final: रिप्लेसमेंट म्हणून आली, फायनलमध्ये चमकली, 'लेडी सेहवाग'ची अंतिम सामन्यात धुव्वाधार बॅटिंग

SCROLL FOR NEXT