Chhattisgarh Accident News  Saam tv
देश विदेश

Horrific Accident : मुलगी पाहण्याचा कार्यक्रमाला गेले, पुन्हा परतलेच नाही; भीषण अपघातात ३ तरुणांचा जागीच मृत्यू

Horrific Accident in Chhattisgarh : मुलगी पाहण्याचा कार्यक्रमाला गेलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. छत्तीसगडमधील भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

छत्तीसगडच्या बलरामपूरमध्ये भरधाव वेगाने तिघांचा बळी घेतला आहे. पिकअप आणि दुचाकीच्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिघेही दुचाकीने प्रवास करत होते. भीषण अपघातानंतर रस्त्यावर एकच वाहतूक कोंडी निर्माण झाली. पिकअप वाहनाविषयी अधिकृत माहिती मिळालेली नाही.

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार,पोलिसांनी दुचाकीवरील प्रवास करणाऱ्या तिघांचा मृतदेह ताब्यात घेऊन कारवाई सुरु केली आहे. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, दुचाकीने पिकअपला जोरदार धडक दिली. यात तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, तिन्ही तरुण रविवारी दुपारच्या सु्मारास मुलगी पाहण्याचा कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम झाल्यावर परतताना तिघांचा अपघात झाला. अपघातात इतका भीषण होता की, तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यात ४० वर्षीय व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला. एका अज्ञात वाहनाच्या धडकेत ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. कवर्धा सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघाताची घटना घडली. अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली.

ग्राम राम्हेपूरजवळील रायपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंटच्या टँकरने कारला जोरदार धडक दिली.त्यानंतर टँकर नादुरुस्त असलेल्या ट्रकवर आदळला. त्यानंतर हा ट्रक जवळपास 200 फुट खाली खोल दरीत कोसळला. त्यानंतर सिमेंट बकलर टँकरने देखील खोल दरीत कोसळला. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले. तर बकलरमधील ड्रायव्हरसह क्लीनर देखील जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

'फक्त सांगा कोणती मुलगी पाठवू'; भाजप महिला नेत्याचा सेxx स्कँडलचा पर्दाफाश, नेत्यांना पुरवते परदेशी तरूणी

SCROLL FOR NEXT