Madhya Pradesh News  Saam Tv
देश विदेश

Shocking: हृदयद्रावक! नवऱ्यासोबत गरबा खेळताना भयंकर घडलं, हार्ट अटॅकने महिलेचा जागीच मृत्यू

Madhya Pradesh Video: मध्य प्रदेशमध्ये एका महिलेचा गरबा खेळताना मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. नवऱ्यासोबत गरबा खेळत असताना ही महिला खाली पडली आणि तिचा जागेवरच मृत्यू झाला.

Priya More

Summary -

  • मध्य प्रदेशातील पलासी गावात गरब्यात हृदयद्रावक घटना घडली.

  • १९ वर्षीय नवविवाहित महिलेचा गरबा खेळताना मृत्यू झाला.

  • हार्ट अटॅकने या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली

  • नवऱ्यासोबत गरबा खेळताना महिला जमिनीवर कोसळली.

  • लग्नानंतर अवघ्या ३ महिन्यात महिलेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे

मध्य प्रदेशमध्ये गरबा खेळताना एका महिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्गा देवीच्या मंडपामध्ये नवऱ्यासोबत गरबा खेळत असताना ही महिला जमिनीवर कोसळली. हार्ट अटॅकने तिचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेमुळे दुर्गा मंडपमध्ये एकच गोंधळ उडाला. महिलेला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

'ओ मेरे ढोलना' या गाण्यावर ही महिला आपल्या नवऱ्यासोबत डान्स करत होती. बायकोसोबतचा हा शेवटचा गरबा असेल असं या तरुणाला वाटलं देखील नसेल. बायकोच्या मृत्यूमुळे या तरुणाला आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. ही घटना भीकनगावच्या पलासी गावामध्ये घडली. या महिलेच्या मृत्यूनंतर दुर्गा देवीच्या मंडपमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिंगाजी मंदिरामध्ये दुर्गा मातेची मूर्ती बसवण्यात आली होती. याठिकाणी गरब्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी १९ वर्षीय सोनम नवरा कृष्णालालसोबत गरबा खेळत होती. गरबा खेळत असताना सोनम अचानक जमिनीवर खाली कोसळली. तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे याच वर्षी मे महिन्यात सोनमचे लग्न झाले होते. लग्नानंतर ३ महिन्यातच तिचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सोनम ही टेमला गावची रहिवासी होती. तिचे लग्न १ मे रोजी पलासी गावातील रहिवासी कृष्णालाल याच्याशी झाले होते आणि ती नवविवाहित जोडप्या म्हणून पंडालमध्ये उपस्थित राहण्यासाठी पोहोचली होती. जिथे ही दुःखद दुर्घटना घडली. घटनेनंतर कुटुंबाने महिलेची गावातीलच डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. ज्यांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर सोमवारी सकाळी महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: हिंसाचारामागील आरोपीला शोधून काढू, कडक कारवाई करू; CM फडणवीसांचा इशारा|VIDEO

IND Vs Pak : भारतीय राष्ट्रगीताचा पाकिस्तानी खेळाडूंकडून अपमान, राष्ट्रगीत सुरु असताना रौफ-आफ्रिदीनं नको ते केलं, पाहा Video

Maharashtra Live News Update: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रावळपाडा पुलाखाली प्रचंड वाहतूक कोंडी

Teeth Whitening: दात पिवळे पडलेत? तर त्वरीत पांढरे करण्यासाठी करा 'हे' प्रभावी घरगुती उपाय

Face Care: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किनसाठी रात्री झोपताना लावा कोरफड आणि गुलाबपाणी, पाच दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT