Pune Garba: भाजप खासदारानं गरबा बंद पाडला; ऐन कार्यक्रमावेळी खासदाराची धाड

MP Medha Kulkarni Halts Garba Celebration : भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी ध्वनी उल्लंघन आणि रहिवाशांच्या तक्रारींचे कारण देत पुण्यातील गरबा कार्यक्रम थांबवला. या घटनेमुळे शहरात राजकीय आणि सांस्कृतिक वाद निर्माण झाला.
MP Medha Kulkarni Halts Garba Celebration
BJP MP Medha Kulkarni intervenes and shuts down Garba event in Pune over noise complaints.saam tv
Published On
Summary
  • पुण्यात भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी गरबा कार्यक्रम बंद पाडला.

  • आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका ठेवत कारवाई केली.

  • रहिवाशांच्या तक्रारीनंतर खासदारांनी हस्तक्षेप केला.

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्यातील भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी गरबा कार्यक्रम बंद पाडला. ऐन कार्यक्रम रंगात आला असतानाच भाजप खासदारांनी धाड टाकत गरबा बंद पाडला. गरब्याच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका ठेवत मेधा कुलकर्णी यांनी गरबाचा कार्यक्रम बंद पाडला. वारंवार शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केले. परंतु आवाजच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कार्यक्रमांवर कोणती कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आपण कार्यक्रमात येत गरबा बंद पाडल्याचं खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

MP Medha Kulkarni Halts Garba Celebration
Anganwadi Teacher: अंगणवाडी शिक्षिका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी! सेवासमाप्तीची वयोमर्यादा वाढली

या ठिकाणी मोठ्याप्रमाणे गोंधळ आणि धिंगाणा होत असल्यामुळे याचा येथे राहणाऱ्या रहिवाशांना खूप त्रास होतो. आपल्याला गोंधळा आणि गोंगाटाचा व्हिडिओ एकाने पाठवला, त्यामुळे आता येथून पुढे नियमभंग करणारे कार्यक्रम होऊ दिले जाणार नाही, असा भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी इशारा दिला. कार्यक्रमाचा आवाजा मोठ्या प्रमाणात येतोय. त्याचा वृद्ध, लहान मुलांना, आजारी रुग्णांना या आवाजाचा त्रास होतोय, त्यामुळे येथून पुढे हा कार्यक्रम होणार नसल्याचं भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं.

MP Medha Kulkarni Halts Garba Celebration
Marathi Sahitya Parishad: मराठी साहित्य परिषदेत राडा; निषेध नोंदवणाऱ्यांना धक्काबुक्की|Video

गरबा कार्यक्रमाचा खूप आवाज होत आहे. आपण आरतीसाठी गेले असताना अनेकांनी येथील गोंगाटाचे व्हिडिओ काढून पाठवले. हवेतर मी व्हॉट्सअप देखील दाखवते. एक लिव्हर कॅन्सर झालेले पेशंट आहे. एक ९० वर्ष वृद्ध व्यक्ती आहे, ते कशी अवस्था होत असेल. दरवर्षी येथे दहीहंडीचे कार्यक्रम होत असतात. तुम्हाला असं राहणं पसंत आहे का सांगा. तुमच्या घरीही आजी, आजोबा असतील. आजारी माणसे असतील, लहान मुलं असतील.

हा कार्यक्रम आजपासून येथून या ग्राऊंडवर होणार नाही. आजुबाजुच्या परिसरातील लोकांना आवाजाचा मोठा त्रास होतोय. हा कार्यक्रम नियमभंग करून होतोय. सर्व धार्मिक नियम तोडून कार्यक्रम होतोय. आवाजाची मर्यादा पाळली जात नाही. त्यामुळे शास्त्री नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असल्याची माहिती खासदार कुलकर्णी यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com