Marathi Sahitya Parishad: मराठी साहित्य परिषदेत राडा; निषेध नोंदवणाऱ्यांना धक्काबुक्की|Video

Marathi Sahitya Parishad Over Election Dispute : निवडणुकीला उशीर झाल्याच्या निषेधार्थ मराठी साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राडा झाला. त्यात निषेध करणाऱ्या भानुदास धुरगुडे यांना धक्काबुक्की झाल्याचं सांगण्यत येत आहे. मिलिंद जोशी यांच्या अनधिकृत गटावर त्यांनी गंभीर आरोप केलेत.
Marathi Sahitya Parishad Over Election Dispute
Scuffle erupts at Marathi Sahitya Parishad meeting after protest over election dispute.saam tv
Published On
Summary
  • मराठी साहित्य परिषदेच्या सभेत गोंधळ आणि धक्काबुक्की.

  • निवडणुका न झाल्याने निषेध नोंदवला गेला.

  • राजकुमार धुरगुडे यांनी मिलिंद जोशी गटाविरोधात आक्षेप घेतला.

सचिन जाधव, ,साम प्रतिनिधी

मराठी साहित्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घडला. परिषदेचे आजीव सभासद राजकुमार दुरगुडे पाटलांकडून कार्यकारणीच्या निवडणुका होत नसल्याने निषेध केला. भानुदास धुरगुडे हे संवैधानिक पद्धतीने हातात घोषणाचा फलक घेऊन निषेध नोंदवण्यासाठी सभागृहात आले. त्यावेळी त्यांना मिलिंद जोशी यांच्या अनधिकृत गटाच्या उपस्थितांनी सभागृहात प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढत दरवाजा बंद केला.

धुरगुडे यांनी यापूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे मिलिंद जोशी आणि इतर अनधिकृत गटा विरोधात तक्रार दाखल केली होती. या अनधिकृत गटाला अशा प्रकारची बैठक घेण्याचा कुठलाही अधिकार नसताना ते या ठिकाणी बैठक घेत होते. या गोष्टीला विरोध करण्यासाठी राजकुमार धुरगुडे बैठकीच्या ठिकाणी आले होते.

मसापचे कामकाज स्वयंघोषित अनाधिकृत गट चालवत आहे, त्यांनी जबरदस्तीने मसाप कार्यालयाचा ताबा घेऊन या ठिकाणी बैठक घेतली. याविरोधात काल राजकुमार धुरगुडे यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात कलम '४१ अ' अंतर्गत तक्रार नोंदवलीय.

त्या तक्रारीची माहिती आज सकाळी मसाप कार्यालयात दिली होती आणि अशा प्रकारची अनाधिकृत गटाला या ठिकाणी बैठक घेण्यास मज्जाव करावा अशी विनंती केली होती. त्याचाच संदर्भ देत ते आज सभागृहात आपला निषेध संवैधानिक मार्गाने व्यक्त करण्यासाठी आले होते. मात्र, मसापच्या अनधिकृत गटाने त्यांना सभागृहात येऊ न देता आतून दरवाजा बंद करून घेतला आणि राजकुमार यांना आत मध्ये येण्यापासून रोखलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com