Garba In Mumbai Local Train: महिलांचा स्वॅगच भारी, धावत्या ट्रेनमध्ये खेळला गरबा, Video व्हायरल

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांनी नवरात्रीच्या निमित्ताने गरबा खेळला. धावत्या ट्रेनमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी महिलांच्या उत्साहाचे कौतुक केले आहे.
Garba In Mumbai Local Train
Garba In Mumbai Local TrainSaam Tv
Published On

रेल्वेला मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून संबोधिली जाते. दिवसाचा अर्धा वेळ व्यक्ती ट्रेनमध्ये प्रवासांमध्ये घालवते. कामानिमित्त सकाळ संध्याकाळ ट्रेनमधून प्रवासी प्रवास करतात यामध्ये महिलांचा देखील समावेश असतो. ट्रेनमधील महिलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामध्ये महिला कधी भाजी निवडतात तर कधी पुस्तके वाचतात. महिला अंभग- किर्तन देखील ट्रेनमध्ये करतात. नुकताच महिलांनी ट्रेनमध्ये गरबा खेळला आहे. या महिलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Garba In Mumbai Local Train
Gujrat Viral News: पोलिसांच्या व्हॅनवर १० मिनिटे अश्लील चाळे, गर्लफ्रेंड अन् बॉयफ्रेंडचा नको 'तो' प्रकार, Video होतोय व्हायरल

नवरात्री सणांचा सर्वत्र उत्साह सुरू आहे. नवरात्रीनिमित्त महिलांनी ट्रेनमध्ये गरबा खेळत आनंद साजरा केला आहे. अनेक ठिकाणी गरबानिमित्त खास कार्यक्रम राबवले आहेत यामुळे येथे गर्दी असते. मात्र नोकरीला जाणाऱ्या महिलांना गरबा खेळण्यासाठी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे ट्रेनमध्ये महिला या पारंपारिक लूकमध्ये नवरात्रीचे रंग फॉलो करत गरबा खेळतात.

या महिलांनी ट्रेनमध्ये प्रवास करताना गरबा खेळला आहे. कामाच्या व्यापातून थोडा वेळ महिलांनी एकत्र येऊन गरबा खेळला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला आनंदात गरबा खेळत आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Garba In Mumbai Local Train
Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com