Terror Plot News Saam Tv
देश विदेश

Terror Alert : मोठी बातमी! टॉय कारमध्ये IED ठेवून हल्ल्याचा कट; महाराष्ट्र कनेक्शन उघड, ३ राज्यांतून चौघांना बेड्या

Delhi terror plot : दिल्लीमध्ये टॉय कारमध्ये IED ठेवून साखळी स्फोट घडवण्याचा मोठा दहशतवादी कट उधळून लावण्यात आला आहे. महाराष्ट्रासह तीन राज्यांतून चार आरोपींना अटक करण्यात आली.

Namdeo Kumbhar

toy car bomb plot in Delhi details : राजधानी दिल्ली पुन्हा एकदा मोठ्या दहशतवादी कटाने पुन्हा एकदा हादरली आहे. खेळण्यातील कारमध्ये (टॉय कार) आयईडी (IED) स्फोटके ठेवून दिल्लीत साखळी स्फोट घडवण्याचा कट दिल्ली पोलिसांनी(Special Cell) उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रासह तीन राज्यांतून चार तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोसैब अहमद, मोहम्मद हम्माद, शेख इमरान आणि मोहम्मद सोहेल यांचा समावेश आहे. हे चौघेही सोशल मीडियावरील ग्रुप्सच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. धक्कादायक म्हणजे हे तरुण सामान्य कामगार म्हणून वावरत होते. यात कोणी ऑटो मॅकेनिक, तर कोणी प्लंबर आणि सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. या संशयितांच्या मोबाईल चॅटमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंसोबतच अयोध्या येथील राम मंदिर, भारतीय संसद आणि लष्करी ठिकाणे निशाण्यावर असल्याचे तपासातून समोर आले. चारही आरोपी रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने आयईडी (IED) स्फोटक बनवण्याच्या अंतिम टप्प्यात होते. पोलिसांनी त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य, खिळे आणि रिमोट कंट्रोल कार जप्त केली आहे.

ऐतिहासिक इमारती होत्या निशाण्यावर

मिलालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर दिल्लीतील ऐतिहासिक आणि अत्यंत संवेदनशील इमारती होत्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी लाल किल्ला आणि इंडिया गेटची रेकी केल्याचेही उघड झाले आहे. या ठिकाणांवर मोठा हल्ला करण्यासाठी चौघांनी कट रचला होता. पण दिल्ली पोलिसांनी हा कट उधळून लावलाय. हे चौघेही 'गजवा-ए-हिंद' या कट्टरपंथी विचारांनी प्रेरित होऊन देशात मोठे बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते.

कसा उघड झाला कट?

काही दिवसांपूर्वीच दिल्लीत स्फोट करण्याचा अशाच प्रकारचा प्रयत्न झाला होता, तेव्हापासून पोलीस सतर्क होते. तपासादरम्यान पोलिसांना या तरुणांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी महाराष्ट्र, बिहार आणि ओडिशातून या चौघांच्या मुसक्या आवळल्या. काही वर्षांपूर्वीच्या घटनांचा संदर्भ घेत पोलिसांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करण्याचा हा मोठा कट होता. पण वेळीच कारवाई केल्यामुळे फसला आहे. सध्या पोलीस या आरोपींचे इतर कोणाशी संबंध आहेत का? याचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT